सिद्धार्थ महाविद्यालय एन.एस.एस युनिट तर्फे सावरोली गावात वृक्षारोपण .

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सिद्धार्थ महाविद्यालय एन.एस.एस युनिट तर्फे सावरोली गावात वृक्षारोपण .

ठाणे -(तळवली वार्ताहर) : मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालय एन.एस.एस युनिट ( बुद्ध भवन ) यांच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील आसनगाव येथील सावरोली गाव येथे नुकताच वृक्षारोपण उपक्रम करण्यात आला. यावेळी एन.एस.एस.च्या विद्यार्थ्यांनी एकूण १०० हून अधिक वृक्षारोपण केले. सोबत हातात वृक्षारोपण संबंधित पोस्टर घेवून गावामध्ये वृक्षारोपणाची जनजागृती केली.
या उपक्रमात सिद्धार्थ महाविद्यालय एन.एस.एसचे कार्यक्रम अधिकारी प्रा. धनंजय चंदनशिवे आणि प्रा. नरेश लाडे उपस्थित होते. सोबतच वृक्षारोपण उपक्रमाला सहकार्य म्हणून माजी एन.एन.एस.स्वयंसेवक देखील उपस्थित होते. Siya Green Creation ( सिया हरी सृष्टी) बदलापूर यांनी रोपटी देवून तर गावातील ग्रामपंचायत सदस्य- स्वयंसेवक जालिंदर तळपाडे आणि अजय डोंगरे यांनी वृक्षारोपणासाठी जागा देवून सहकार्य केले.

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]