ग्रुप ग्रामपंचायत निवेली कार्यालय जानशी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

ग्रुप ग्रामपंचायत निवेली कार्यालय जानशी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

दिनेश कु्वेस्कर (वार्ताहर )

जानशी (ता. राजापूर): आज, दिनांक 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात ग्रुप ग्रामपंचायत निवेली कार्यालय जानशी येथे साजरी करण्यात आली.

 

कार्यक्रमाची सुरुवात शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पार्पण करून करण्यात आली. यावेळी ग्रुप ग्रामपंचायत निवेलीच्या सरपंच सौ. स्नेहा दिनेश कुवेसकर, उपसरपंच श्री. एकनाथ दत्ताराम आगरे, ग्रामपंचायत अधिकारी श्री. सचिन शांताराम हातणकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. रविकांत बाणे, आरोग्य सेविका उपकेंद्र जानशीच्या श्रीमती राऊळ मॅडम, तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.

 

कार्यक्रमात शिवरायांच्या शौर्य, पराक्रम आणि राज्यकारभाराच्या तत्त्वांवर मार्गदर्शनपर विचार मांडले गेले. उपस्थित मान्यवरांनी शिवरायांचे चरित्र हे केवळ ऐतिहासिक नव्हे तर प्रत्येक पिढीसाठी आदर्श प्रेरणा देणारे असल्याचे सांगितले.

 

शाळेतील विद्यार्थी, ग्रामस्थ आणि विविध संस्था प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामपंचायत निवेलीच्या सर्व सदस्यांचे आणि उपस्थित ग्रामस्थांचे आभार व्यक्त करण्यात आले.

 

कार्यक्रमाचा समारोप जय भवानी, जय शिवाजी या गजरात झाला आणि उपस्थितांमध्ये छत्रपती शिवरायांप्रती निष्ठा आणि आदरभाव अधिक दृढ झाला.

 

जय जिजाऊ! जय शिवराय!

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें