शाश्वत कोकण परिषदेने घेतली मंत्री उदय सामंत यांची भेट

शाश्वत कोकण परिषदेने घेतली मंत्री उदय सामंत यांची भेट

कोकणातील प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा*

समिर शिरवडकर-रत्नागिरी.

रत्नागिरी :- दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ रोजी शाश्वत कोकण परिषदेतर्फे महाराष्ट्राचे उद्योग मंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री मा. उदयजी सामंत यांची मुंबई येथे भेट घेण्यात आली.यावेळी त्यांना शाश्वत कोकण परिषदेच्या कोकणाविषयीच्या धोरणात्मक मागण्यांचा मसुदा देण्यात आला.
निसर्गसंपन्न कोकणात रिफायनरी व अन्य प्रदूषणकारी प्रकल्प* प्रस्तावित करू नये असे ठामपणे मांडण्यात आले.कोकणात रोजगार व समृद्धीसाठी शासनकर्ते व नितीकर्ते यांच्या सोबत संवादाची भूमिका राहील असे सांगण्यात आले.मासेमारांच्या मुद्द्यांविषयीही सविस्तर चर्चा करण्यात आली.
भेटीत शाश्वत कोकण परिषदेचे निमंत्रक सत्यजीत चव्हाण , अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष  देवेंद्र तांडेल , बारसु – सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष( मुंबई) वैभव कोळवणकर व खजिनदार (मुंबई) विनायक शिंदे.सोलगावचे संतोष तीर्लोटकर , नाणार-पाळेकरवाडीचे *सत्यवान पाळेकर* , पडवेचे *सुशील वालम* , देवाचे गोठणेचे *योगेश चव्हाण* व ओझर – राजापूरचे *चंद्रकांत कुर्ले* उपस्थित होते.

Samir Shirvadakar
Author: Samir Shirvadakar

???? समिर शिरवडकर ???? राजापुर तालुका - मिडिया को- ऑर्डीनेटर मु. पो. जैतापूर, ता. राजापुर जि.रत्नागिरी.

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें