जय शिवराय मित्रमंडळ कोंडगाव – साखरपा पंचक्रोशी वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात संपन्न 

जय शिवराय मित्रमंडळ कोंडगाव – साखरपा पंचक्रोशी वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात संपन्न 

शिवभक्तांमध्ये संचारला उत्साह 

साखरपा – ( भरत माने वार्ताहर ) जय शिवराय मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी शिवजयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी देखील विविध उपक्रमानी शिवजयंती साजरी करण्यात  आली.16 फेब्रुवारी पासून या उत्सवाला नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेने  प्रारंभ झाला. ही स्पर्धा  तीन दिवस दिमाखदार पद्धतीने चालली..या स्पर्धेच्या विजेत्या  रुद्र कस्तुरी संघाला 7000/-  व आकर्षक छत्रपती चषक, उपविजेत्या किरबेट संघाला 5000/- व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.स्पर्धेचे सर्वच  सामने  रोमांचक झाले. स्पर्धेत अनेक संघांनी आपला  सहभाग नोंदविला.मंगळवार दि. 18 फेब्रुवारीला विशालगड किल्ल्यावरून मंडळाच्या वतीने शिवज्योत आणण्यात आली. किल्ल्यावरून दुपारी शिवज्यो तीचे मार्गक्रमण सुरु झाले.सायंकाळी 7 वाजता विशालगड, आंबा घाट,कोंडगाव बाजारपेठ, पुर्ये भवानी मंदिर व गिरजाई मंदिर अशा पद्धतीने कार्यक्रमस्थळी ज्योत आणण्यात आली. यावेळी शेकडो शिवभक्त सहभागी झाले. जिजाऊ महिला मंडळाच्यावतीने  ज्योतीचे स्वागत करण्यात आले. तसेच यावेळी हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. काल दिनांक 19 फेब्रुवारी  सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त महाराजांच्या मूर्तीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.यावेळी रथामध्ये बसविण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.या मिरवणुकीची रंगत वाढविण्यासाठी यामध्ये डीजेच्या तालावर परिसरातील तरुणाई थिरकत होती. शिवाजी महाराजांच्या घोषणानी परिसर दणानून  गेला.त्यानंतर महाराज्यांच्या मूर्ती समोर दीपोत्सव,महाआरती  पार पडली. रात्री पारंपारिक सांस्कृतिक नृत्य कार्यक्रम पार पडला. यावेळी परिसरातील विद्यार्थ्यांनी आपल्या  कला सादर केल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित गाणी,देखावे यावेळी साजरे करण्यात आले.या सर्व कार्यक्रमाचे आयोजन जय शिवराय मित्रमंडळ व जिजाऊ महिला मंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे. दररवर्षी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी विविध उपक्रमाचे मंडळाच्या वतीने आयोजन करण्यात येते.यंदाचे मंडळाचे आयोजनाचे 9 वे वर्ष होते. यावेळी मंडळाच्या वतीने सहभागी स्पर्धक, देणगीदार यांचे आभार मानले. अशाप्रकारे मोठ्या उत्साहात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें