एसटीची एकच फेरी असल्याने शाळकरी मुलाचे हाल,शाळा सुटली तरीही, मुले शाळेच्या आवारात

*एसटीची एकच फेरी असल्याने शाळकरी मुलाचे हाल,शाळा सुटली तरीही, मुले शाळेच्या आवारात

 

*रोजचाच दिनक्रम,मुलांची नाराजी,तर एसटी महामंडळ एकले नाही तर आंदोलन – सरपंच दशरथ मांजरेकर

 

*समिर शिरवडकर-रत्नागिरी

 

रत्नागिरी:-राजापूर:(साखर):-राजापूर तालुक्यातील बॅ. नाथ पै शाळा साखर कोंबे मधील विद्यार्थ्यांना एसटी साठी नेहमीच कसरत करावी लागत आहे, काही महिन्यांपूर्वी एस. टी.महामंडळ राजापूर यांच्याकडून एसटी मागणी नुसार गरज पूर्ण झाली होती, ती अशी होती की जैतापूर व्हाया साखर कोंबे करून ती राजापूरला जाणार होती, यासाठी शाळेमधील विद्यार्थी पालक आणि शिक्षकांनी मिळून एसटीच्या वेळापत्रकानुसार आपल्या शाळेची वेळ बदलून घेतली होती जेणेकरून मुलांना वेळेवरती आपल्या घरी पोचता येईल व आपल्याला दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करून पुन्हा शाळेत येता येईल परंतु गेले कित्येक दिवस साखर शाळेपर्यंत एसटी वेळेवर पोहोचत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप हाल होत आहेत त्यांना आपल्या घरी जाण्यासाठी रात्रीचे आठ वाजत आहेत या विषयावरती गंभीरपणे महामंडळाने विचार केला पाहिजे असे संपूर्ण ग्रामस्थांचे मत आहे.

एस. टी. महामंडळाच्या सांगण्यावरून शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांच्या निर्णयामुळे शाळा सायंकाळी चार वाजता सुटत असून, परंतु एसटी वेळेत नसल्याने तब्बल चार चार तास मुलं शाळेच्या आवारात एसटीची वाट बघत ताटकळत उभी असतात त्यानंतर ते घरी पोहोचून थकलेल्या अवस्थेमध्ये अभ्यास करतील का असा प्रश्न निर्माण होतो? त्याचप्रमाणे ग्रामीण भागाचे रस्ते डांबरी नसल्याने जंगलातून असल्याकारणाने विविध जंगली आणि सरपटणाऱ्या प्राण्यांची देखील भीती निर्माण होऊ शकते अशा परिस्थितीमध्ये एसटी महामंडळाने वेळीच त्याची दखल घेतली पाहिजे अन्यथा याचे रूपांतर आंदोलनात होईल अशी प्रतिक्रिया साखर कोंबे सरपंच सन्माननीय दशरथ मांजरेकर यांनी केली आहे.ते असेही बोलत होते की ही सर्व परिस्थिती वारंवार एसटी महामंडळ राजापूर चे अधिकारी कदम यांनी सांगून काहीही उपयोग होत नाही.जर काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत काही प्रकार घडला तर आम्ही ग्रामस्थ शांत बसणार नाही ,याची संपून जबाबदारी एसटी महामंडळ राजापूर हेच असतील.

 

*आम्ही दररोज एसटीची वाट पहात असतो, आमची शाळा सायंकाळी ४.००वाजता सुटते मात्र एसटी सायंकाळी ७.०० ते ७.३० ला येते आम्हला अभ्यास करण्यासाठी वेळ मिळत नाही”

[ विद्यार्थी- बॅ.नाथ पै.शाळा साखर कोंबे]

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें