इंग्लंडला नमवत दक्षिण आफ्रिकेचा उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश; अफगाणिस्तानचे आव्हान संपुष्टात

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इंग्लंडला नमवत दक्षिण आफ्रिकेचा उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश; अफगाणिस्तानचे आव्हान संपुष्टात

कराची– दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील एकाच सामन्यात तीन संघांचा निकाल लागल्याचे आता समोर आले आहे. दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडवर विजय साकारला आणि त्यांनी सेमी फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे अफगाणिस्तानचे आव्हान संपुष्टात आले आहे. तिसरी गोष्ट म्हणजे इंग्लंडवर नामुष्कीची वेळ आली आहे.

इंग्लंड यापूर्वीच चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर गेली होती. पण या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंडला एकही सामना जिंकता आला नाही आणि हीच त्यांच्यावर नामुष्कीची वेळ होती. दक्षिण आफ्रिकेने सात विकेट्स राखत हा सामना सहजपणे जिंकला आणि इंग्लंडला धुळ चारली. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १८० धावांचे माफक आव्हान होते. पण दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर स्ट्रीस्टब स्टब्स हा शून्यावर बाद झाला आणि इंग्लंड या सामन्यात कमबॅक करणार का, असे वाटत होते. पण त्यावेळी रॅसी व्हॅन डर डुसानने यावेळी इंग्लंडचे मनसुबे उधळून लावले. डुसानने यावेळी इंग्लंडच्या गोलंदाजीवर तुफानी हल्ला चढवला. डुसेनला त्यानंतर हेन्रीच क्लासिनची सर्वांत चांगली साथ मिळाली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १२७ धावांची भागीदारी रचली आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

संघ विजयावर शिक्कामोर्तब करणार, असे वाटत असतानाच क्लासिन बाद झाला. क्लासिनने यावेळी ११ चौकारांच्या जोरावर ६४ धावांची खेळी साकारली. क्लासिन बाद झाला असला तरी डुसानने यावेळी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. डुसानने यावेळी सहा चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद ७२ धावांची खेळी उभारली आणि संघाला विजयपर्यंत पोहोचवले. इंग्लंडच्या गोलंदाजांनी अचूक आणि भेदक मारा करत इंग्लंडच्या फलंदाजांना आपल्यापुढे लोटांगण घालायला भाग पाडले. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को जेन्सनने यावेळी इंग्लंडला एकामागून एक धक्के दिले आणि त्यांच्या डावाला खिंडार पाडले. मार्कोला यावेळी अन्य गोलंदाजांची सुयोग्य साथ मिळाली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला इंग्लंडचा डाव १७९ धावांत रोखता आला होता.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]