गुहागर तहसील कार्यालयाच्या वतीने गोपाळगड परिसर स्वच्छता मोहीम राबवली

गुहागर तहसील कार्यालयाच्या वतीने गोपाळगड परिसर स्वच्छता मोहीम राबवली

 

तळवली (मंगेश जाधव) : शासनाच्या १०० दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत गुहागर तहसील कार्यालयाच्या वतीने अंजनवेल (ता. गुहागर) येथील ऐतिहासिक गोपाळगड किल्ला आणि परिसराची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

 

या मोहिमेत गुहागर तहसीलदार परीक्षित पाटील, नायब तहसीलदार मेहेता, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक, महसूल सहाय्यक, शिपाई तसेच तहसील कार्यालयातील सर्व क्षेत्रीय आणि कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.

 

ही मोहीम गडाच्या स्वच्छतेसह, पर्यावरण रक्षण आणि पर्यटन वाढीस चालना देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आली. गड परिसरातील प्लास्टिक व अन्य कचऱ्याची साफसफाई करण्यात आली. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवण्याची ग्वाही दिली.

 

स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनीही या मोहिमेचे कौतुक केले. गुहागर तहसील कार्यालयाच्या या उपक्रमामुळे गोपाळगड परिसर अधिक स्वच्छ आणि आकर्षक होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें