पुण्यात गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी संताप; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पुण्यात गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी संताप; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

 

पुणे -पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तनिषा भिसे या गर्भवती महिलेला दाखल करण्याआधी दहा लाख रुपये भरण्याची अट रुग्णालयाने घातली. अडीच लाख रुपये भरायला तयार असतानाही रुग्णालयाने उपचार नाकारल्याने कुटुंबीयांना तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवावे लागले. तिथे दोन जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला.

 

या घटनेमुळे संताप व्यक्त होत असून आमदार अमित गोरखे यांनी सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून रामेश्वर नाईक यांनीही रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला होता, पण तरीही उपचार नाकारल्याचे समोर आले आहे.

 

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने अंतर्गत चौकशी सुरू केली असून राज्य सरकारला याचा अहवाल सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांनी दिली. महाराष्ट्र राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेत पुणे महानगरपालिका आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

 

या संपूर्ण घटनेने पुणे शहरात संतापाची लाट उसळली असून खासगी रुग्णालयांच्या कार्यपद्धतीवर तीव्र टीका होत आहे.

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]