७१व्या वाढदिवसानिमित्त उपक्रमशीलता! रमाकांत (नाना) साळवी यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

७१व्या वाढदिवसानिमित्त उपक्रमशीलता!

रमाकांत (नाना) साळवी यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

 

आबलोली | प्रतिनिधी – संदेश कदम

गुहागर तालुक्यातील खोडदे गावचे माजी पोलिस पाटील आणि लोकशिक्षण मंडळ आबलोलीचे कोषाध्यक्ष रमाकांत (नाना) विष्णू साळवी यांचा ७१ वा वाढदिवस सामाजिक जाणिवेतून साजरा करण्यात आला. त्यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली.

 

या निमित्ताने रमाकांत साळवी मित्र मंडळ, साळवी परिवार, आप्तेष्ट आणि श्री गजानन होतकरू संघ – खोडदे देऊळवाडी यांच्या पुढाकाराने चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय आबलोली येथील इयत्ता ५ वी ते १० वीमधील गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

 

या उपक्रमात श्री. रमाकांत (नाना) साळवी यांचे चिरंजीव श्री. राकेश साळवी, मुख्याध्यापक डि.डी. गिरी, तसेच शिक्षकवर्ग व कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा हा कार्यक्रम कौतुकास्पद ठरला.

 

#रमाकांतसाळवी #वाढदिवसउपक्रम #शैक्षणिकसाहित्यवाटप #आबलोली #खोडदे #गुहागर #RatnagiriNews #SocialInitiative

 

 

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]