रा.प. गुहागर आगाराच्या इतिहासात प्रथमच महामानवांची संयुक्त जयंती जल्लोषात साजरी!

रा.प. गुहागर आगाराच्या इतिहासात प्रथमच महामानवांची संयुक्त जयंती जल्लोषात साजरी!

 

‘गुलामगिरी’ पुस्तकाचे वाटप, बुद्धवंदना आणि भीमस्तुतीने कार्यक्रमास बहार

 

आबलोली (संदेश कदम) –

रा. प. गुहागर आगारात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची संयुक्त जयंती प्रथमच अत्यंत उत्साहात आणि अभूतपूर्व जल्लोषात साजरी करण्यात आली. सामाजिक न्यायाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात ‘गुलामगिरी’ पुस्तकाचे वाटप, बुद्धवंदना आणि दीपप्रज्वलनासह विविध उपक्रम झाले.

 

या वेळी आगार व्यवस्थापक अशोक चव्हाण व प्रमुख पाहुणे, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार पराग कांबळे यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले आणि बौद्ध उपासक अनंत जाधव (वरवेली) व विशाल सावंत (पाटपन्हाळे) यांच्या पुढाकाराने बुद्धवंदना व भीमस्तुती पार पडली.

 

कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक असलेले महात्मा फुलेंच्या ‘गुलामगिरी’ या पुस्तकाचे वाटप मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 

या प्रसंगी आगार प्रमुख अशोक चव्हाण, पत्रकार पराग कांबळे, स्थानकप्रमुख स्वप्नील शिंदे, वाहतूक नियंत्रक सुनील पवार, मनीष साखरकर, रामा पुंड, रवींद्र घाग, सौ. सुषमा डोंगे मॅडम व रा.प.चे अधिकारी-कर्मचारी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन रामा पुंड यांनी केले तर आभार प्रदर्शन सूर्यकांत भोसले यांनी केले.

 

 

 

#गुहागर #महामानवजयंती #महात्माफुले #डॉबाबासाहेबआंबेडकर #गुलामगिरी #गुहागरआगार #संयुक्तजयंती #सामाजिकन्याय #RatnagiriNews #AmbedkarJayanti #PhuleJayanti

 

 

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें