ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना “आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार” जाहीर

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना “आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार” जाहीर

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या विविध पुरस्कारांची घोषणा; वितरण सोहळा जुलैमध्ये मुंबईत

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा “आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार” यंदा ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना जाहीर झाला आहे. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी ही घोषणा सिंधुदुर्गमधील बाळशास्त्री जांभेकर स्मारकात पत्रकारांच्या उपस्थितीत केली.

हा पुरस्कार २५,००० रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे स्वरूप असलेला असून, यापूर्वी मा. गो. वैद्य, दिनू रणदिवे, पंढरीनाथ सावंत, प्रकाश जोशी यांसारख्या नामवंत पत्रकारांना देण्यात आला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

यावेळी परिषदेतर्फे इतर मान्यवर पत्रकारांनाही पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यात –

  • आचार्य अत्रे पुरस्कारमहेश म्हात्रे
  • शशिकांत सांडभोर इलेक्ट्रॉनिक मिडिया पुरस्कारअभिजित करांडे
  • प्रमोद भागवत स्मृती पुरस्कारअमेय तिरोडकर
  • भगवंतराव इंगळे स्मृती पुरस्कारपांडुरंग पाटील (अंमळनेर)
  • नागोजीराव दुधगावकर पुरस्कारसर्वोत्तम गावरस्कर (बीड)
  • दत्ताजीराव तटकरे स्मृती पुरस्कारदिनेश केळुसकर (गोवा सकाळ)
  • सावित्रीबाई फुले महिला पत्रकारिता पुरस्कारसीमा मराठे (सिंधुदुर्ग)
  • माणिकराव देशमुख कृषी पत्रकारिता पुरस्कार (नवीन)बाळासाहेब पाटील (अँग्रोवन)
  • संतोष पवार स्मृती पुरस्कारभरत निगडे (पुणे)

ही पुरस्कार घोषणा बाळशास्त्री जांभेकर यांच्या १७९ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मारकात अभिवादन सभेत करण्यात आली. यावेळी परिषदेमधील त्रैमासिक सभा देखील झाली.

या वेळी परिषद अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, माजी अध्यक्ष गजानन नाईक, तसेच सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, गणेश जेठे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.


#मधुकरभावे #मराठीपत्रकारपरिषद #जीवनगौरवपुरस्कार #पत्रकारिता_पुरस्कार2024 #बाळशास्त्रीजांभेकर #मराठीमीडिया #ratnagirivartahar

फोटो 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]