पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा; आमदार शेखर निकम यांचा चिपळूण शहरात पाहणी दौरा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा; आमदार शेखर निकम यांचा चिपळूण शहरात पाहणी दौरा

पावसाच्या परिणामांवर तातडीच्या उपाययोजनांसाठी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना; आठवड्यात आढावा बैठक

 

चिपळूण | प्रतिनिधी मंगेश जाधव 

 

चिपळूण शहर व परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणींचा आढावा घेण्यासाठी आमदार शेखर निकम यांनी आज विविध संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी स्थानिक नागरिक व अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य त्या उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना दिल्या.

 

तळवली परिसरात आमदारांनी मंगेश जाधव यांच्या उपस्थितीत नागरिकांशी संवाद साधत तेथील पाणी भराव, गटार व्यवस्थापन, रस्त्यांची परिस्थिती आदी बाबींची माहिती घेतली. येत्या आठ दिवसांत या विषयांवर आढावा बैठक घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

 

पाहणी दौऱ्यात आमदार निकम यांनी चिपळूण शहरातील पॉवर हाऊस, प्रांत कार्यालय, बी.एस.एन.एल. ऑफिस, जिप्सी कॉर्नर, पेठमाप नाईक ब्रीज, मुरादपूर येथील गणपती मंदिर परिसर, बहादूरशेखनाका येथील वाशिष्टी नदीवरील जुना पूल व विसर्जन घाट, एन्रॉन ब्रीज, एस.टी. आगाराची नवीन इमारत, वांगडे मोहल्ला येथील निवारा शेड, तसेच खेंड महालक्ष्मीनगर व कांगणेवाडी (दुर्गाआळी) येथील दरडग्रस्त भागांची पाहणी केली.

 

या दौऱ्यात चिपळूण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले, तहसीलदार प्रवीण लोकरे, जलसंपदा विभागाचे उपअभियंता विपुल खोत, डेपो मॅनेजर दीपक चव्हाण, तसेच ऐरिकेशन, बी.एन.सी., राष्ट्रीय महामार्ग, एस.टी. व नगरपालिका विभागाचे अधिकारी सहभागी होते.

 

यावेळी आमदार निकम यांच्यासोबत शौकत मुकादम, जयंद्रथ खताते, तालुकाध्यक्ष नितीन ठसाले, समीर काझी, फैरोजा मोडक, राजा चव्हाण, जाहीर कुंडलिक, समीर जानवरकर, संतोष नलावडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

 

#चिपळूणपावसाळा #शेखरनिकम #चिपळूणविकास #पाणीनिचरा #दरडकोसळणे #RatnagiriNews #RainUpdate #MaharashtraRain

 

फोटो

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]