६ कोटींचं बक्षीस असलेल्या नक्षलवादी ‘हिडमा’ला अटक

???? ६ कोटींचं बक्षीस असलेल्या नक्षलवादी ‘हिडमा’ला अटक!

 

AK-47, स्फोटकं, डेटोनेटरसह अटक; सुरक्षा दलांचं मोठं ऑपरेशन यशस्वी

 

कोरापूट | प्रतिनिधी – देशातील सर्वात मोठ्या नक्षलवाद्यांपैकी एक, ६ कोटी रुपयांच्या इनाम असलेला कुख्यात कुंजाम हिडमा उर्फ मोहन याला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या. ओडिशाच्या कोरापूट जिल्ह्यातील घनदाट जंगलात सुरक्षा दलांनी ही धडक कारवाई केली असून, नक्षलवादाविरोधात सरकारच्या सुरू असलेल्या मोहिमेला मोठं यश मिळालं आहे.

 

हिडमा हा महाराष्ट्रातील गडचिरोली, गोंदिया आणि छत्तीसगडमधील नक्षलवादी कारवायांचा मुख्य सूत्रधार होता. कोरापूट पोलीस आणि डिस्ट्रिक्ट वॉलंटरी फोर्स (DVF) यांच्या संयुक्त पथकाने पेटगुडा जंगलात त्याला अटक केली. या वेळी हिडमाकडून AK-47 रायफल, 35 जिवंत काडतुसे, 117 डेटोनेटर, गनपावडर, चाकू, रेडिओ संच आणि इतर स्फोटकं हस्तगत करण्यात आली आहेत.

 

हिडमा याच्या अटकेमुळे ओडिशा, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश सीमेवरील नक्षल नेटवर्कला जबर धक्का बसला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या नक्षलविरोधी स्पेशल ऑपरेशनचा हा एक भाग आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, आणखी काही ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवले जात आहेत.

 

सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या या कारवाईमुळे भविष्यात हिडमा सारख्या अनेक खतरनाक नक्षलवाद्यांचा बंदोबस्त लवकरच केला जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येतो आहे.

 

 

 

???? फोटो

 

 

???? #नक्षलवाद #हिडमा #ओडिशा #सुरक्षा_दल #AK47 #Explosives #SpecialOperation #NaxaliteArrest #Gadchiroli #KorwaNews #RatnagiriVartahar

 

 

 

© रत्नागिरी वार्ताहर |

 

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें