श्रीरामपूरसाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार हेमंत ओगले यांची ग्वाही

 

श्रीरामपूरसाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार हेमंत ओगले यांची ग्वाही

वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभात अतिक्रमणग्रस्तांसाठी पुनर्वसनाच्या प्रयत्नांची घोषणा; काँग्रेसमध्येच राहण्याची भूमिका स्पष्ट

श्रीरामपूर (अहमदनगर) :

श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांच्या वाढदिवसानिमित्त शहर व तालुक्यात विविध ठिकाणी शुभेच्छा व सत्कार समारंभांचे आयोजन करण्यात आले. राजकीय व सामाजिक संघटनांनी आमदार ओगले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

 

यावेळी आमदार ओगले म्हणाले, “श्रीरामपूर तालुका आणि शहरासाठी निधी कमी पडू देणार नाही. अतिक्रमण झालेल्या ठिकाणी सामान्य नागरिकांचे नुकसान झाले असून त्यांच्या पुनर्वसनासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन भेट घेणार आहे.”

ते पुढे म्हणाले, “सध्या राज्यात जिकडे सत्ता तिकडे पुढारी अशी परिस्थिती आहे. मात्र मी काँग्रेसमध्येच राहून जनतेच्या हितासाठी निष्ठेने कार्य करत राहीन. युवक-युवतींना काँग्रेसमध्ये सहभागी करून पक्षबांधणी करणार आहे.”

कार्यक्रमात जिल्हा प्रतिनिधी आदर्श पत्रकार महाराष्ट्र राज्य संघटनेचे श्रीरामपूर उपाध्यक्ष करण दादा ससाणे यांच्या हस्ते आमदार हेमंत ओगले यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तालुक्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी प्रतिनिधी: नंदकुमार बागडेपाटील, अहिल्यानगर

 

 

 

????️ हॅशटॅग्स (Hashtags):

 

#ShirampurNews #HemantOgle #Congress #Development #अहमदनगर #PoliticalUpdates #VikasNidhi #ShirampurUpdates

 

????️ फोटो

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें