ओव्हरटेकच्या नादात भीषण अपघात; 35 वर्षीय समीर चिवेलकर यांचा मृत्यू

 

???? ओव्हरटेकच्या नादात भीषण अपघात; 35 वर्षीय समीर चिवेलकर यांचा मृत्यू

चिपळूण-कराड महामार्गावर ओमेगा हॉटेलजवळ अपघात; पोलिसांचे तातडीने घटनास्थळी धाव

रत्नागिरी – चिपळूण-कराड महामार्गावर शनिवारी (३१ मे) रात्री उशिरा ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दोन दुचाकींमध्ये भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत खेर्डी येथील ३५ वर्षीय समीर चिवेलकर यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला असून एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.

समीर चिवेलकर हे चिपळूणमधील प्रसिद्ध ‘देसाई आर्किटेक्ट’ यांच्याकडे सहाय्यक म्हणून कार्यरत होते. शनिवारी रात्री आपल्या दुचाकीवरून खेर्डी येथील घरी जात असताना ओमेगा हॉटेलजवळ ओव्हरटेक करताना त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थ आणि चिपळूण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान समीर यांचा मृत्यू झाला.

चिपळूण पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक श्री. महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताचा तपास सुरू असून, सहाय्यक निरीक्षक विलास जाधव व उपनिरीक्षक अनुराधा मेहेर यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी तातडीने उपस्थिती लावली.

समीर यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने चिवेलकर कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. या अपघाताची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

???? #Ratnagiri #Chiplun #AccidentNews #RoadSafety #समीरचिवेलकर #ChiploonKaradHighway #MaharashtraNews

 

???? फोटो

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें