जन्मो जन्मी हाच पती मला लाभो     राजापूर तालुक्यातील साखर गावातील महिलांकडून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना

???? जन्मो जन्मी हाच पती मला लाभो

    राजापूर तालुक्यातील साखर गावातील महिलांकडून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना

 

✍️ राजू सागवेकर-राजापूर

 

▶️ मराठी संस्कृतीची प्रतिमा संस्कृतींच्या निष्ठेचे दर्पण…बांधुनी नात्याचे बंधन ,करीन साता जन्माचे समर्पण.सातो जन्मो जन्मी हाच पती मला मिळो अशी प्रार्थना आज वटपौर्णिमेच्या दिनी वटवृक्षाची मनोभावे भक्तिमय वातावरणात बहुसंख्य सुवासिनी राजापूर तालुक्यातील साखर गावातील जोगवाडी, टेम्बवाडीतील महिलांनी वटवृक्षाची पूजा केली.

 

भारतीय संस्कृतीत पूजनीय मानल्या जाणाऱ्या वडाच्या झाडाची पूजा विवाहित महिला मोठ्या प्रमाणात करतात. जोगवाडी परिसरातील वटवृक्षाजवळ विवाहित स्त्रियांनी हळद, कुंकू, अक्षता, पुष्प आणि नैवेद्य अर्पण करून पारंपरिक पद्धतीने पूजा केली. यावेळी सुवासिनींनी वडाच्या झाडाला सूती दोरा गुंडाळून सात प्रदक्षिणा घातल्या. “सात जन्मी हाच पती मला लाभो, त्याला दीर्घायुष्य मिळो,” अशी प्रार्थना करत महिलांनी वटवृक्षाची आराधना केली.

या प्रसंगी महिलांच्या चेहऱ्यावर सणाचा उत्साह आणि श्रद्धेचे भाव स्पष्ट दिसत होते.

Raju Sagvekar
Author: Raju Sagvekar

???? राजू सागवेकर ???? वार्ताहर (ग्रामीण ) - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमीपत्र ता.राजापुर - 416702

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें