राजापूर हादरलं! कोंड्ये गावात एकाच रात्रीत पाच बंद घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

???? *राजापूर हादरलं! कोंड्ये गावात एकाच रात्रीत पाच बंद घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास!*

राजापूर पोलिसांसमोर मोठं आव्हान

✍️राजू सागवेकर-राजापूर

राजापूर तालुक्यातील कोंड्ये गावात मध्यरात्रीच्या सुमारास घडलेली मोठी चोरीची घटना सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. मंगळवार, ९ जून २०२५ रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शिक्षक कॉलनीसह बौद्धवाडी व मधलीवाडीतील एकूण पाच बंद घरे फोडून अंदाजे सात लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.

चोरी झालेल्या घरांमध्ये कोंड्ये हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक महाडेश्वर, ॲड. मुरलीधर मोरे, योगेश मोरे, शशिकांत लाड आणि अविनाश तावडे यांचा समावेश आहे. घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी मोठ्या शिताफीने ही धाडसी चोरी केली.

घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी तातडीने आपल्या पथकासह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा सुरू केला आहे.

???? गेल्या अनेक दिवसांनंतर राजापूरात मोठ्या प्रमाणात घरफोडीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
एकाच रात्री पाच घरे फोडल्यामुळे चोरट्यांचं नेटवर्क सुस्थितीत कार्यरत असल्याची शंका व्यक्त होत आहे.

राजापूर पोलिसांकडून तपास सुरू असून लवकरच आरोपींचा शोध घेऊन मुद्देमाल हस्तगत केला जाईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Raju Sagvekar
Author: Raju Sagvekar

???? राजू सागवेकर ???? वार्ताहर (ग्रामीण ) - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमीपत्र ता.राजापुर - 416702

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]