वेलदूर नवानगर शाळेमध्ये लोकशाही पद्धतीने शालेय मंत्रिमंडळ निवड..

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वेलदूर नवानगर शाळेमध्ये लोकशाही पद्धतीने शालेय मंत्रिमंडळ निवड..

आरोही रोहीलकर शालेय मुख्यमंत्री तर उप मुख्यमंत्री पदी अनिश पालशेतकर

गुहागर ( सुजित सुर्वे वार्ताहर) तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदूर नवानगर शाळेमध्ये निवडणूक अधिकारी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक डॉ. श्री. मनोज पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शाळेतील शिक्षक अंजली मुद्दामवर, धन्वंतरी मोरे, सुषमा गायकवाड, अफसाना मुल्ला यांच्या उपस्थितीत शालेय मंत्रिमंडळ निवड लोकशाही पद्धतीने करण्यात आली.शाळेचा विद्यार्थी प्रमुख मुख्यमंत्री म्हणून इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी आरोही रोहिलकर हिची निवड झाली. तसेच उपमुख्यमंत्री म्हणून अनिश पालशेतकर या विद्यार्थ्यांची निवड झाली सांस्कृतिक मंत्री सान्वी रोहिलकर,क्रीडामंत्री अंश कोळथरकर,परिपाठ मंत्री अदवेत पालशेतकर,सहलमंत्री पूर्वा जाधव,सफाईमंत्री अश्विन रोहिलकर,सहशालेय मंत्री शौर्या पालशेतकर,पाणीपुरवठा मंत्री जितेश भोसले,टोलमंत्री रुद्र नाटेकर, उपक्रममंत्री दक्ष रोहिलकर यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन मुख्याध्यापक व शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]