तळवली कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 तळवली कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी!

नवी मुंबई (मंगेश जाधव वेळबंकर)

पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, तळवली, ता. गुहागर, जि. रत्नागिरी येथे गुरुवार, १० जुलै २०२५ रोजी ‘गुरुपौर्णिमा’ अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य महावीर थरकार सर यांच्या स्वागताने झाली. प्रा. अमोल जड्याळ सर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले, त्यानंतर इतर उपस्थित गुरुजनांचेही स्वागत करण्यात आले. कु. शर्वरी शितप हिने स्वागतपर भाषण आणि प्रास्ताविक केले. यानंतर आर्यन गुरव, सर्वेश जोशी, जागृती लोंढे, अनिश जोगळे, शिवानी गुरव, रसिका डाकवे, श्रवण कळंबाटे, नयना पवार या विद्यार्थ्यांनी गुरुजनांविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करत मनोगत व्यक्त केले. आपल्या जीवनातील वाटचालीत गुरूंचे महत्त्व अनमोल असून, त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय आयुष्यातील खडतर प्रवास यशस्वी करणे कठीण आहे, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

यावेळी प्रा. अमोल जड्याळ सर यांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. त्यानंतर प्राचार्य महावीर थरकार सर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “प्रत्येक व्यक्ती इतर व्यक्तींकडून काहीतरी नवीन शिकत असते. विशिष्ट प्रसंगी आपल्याला कोणाची ना कोणाची तरी मदत आणि मार्गदर्शन मिळत असते. अशी प्रत्येक व्यक्ती ही आपली गुरू असते. केवळ शिक्षकच आपले गुरू नसून, आपले माता-पिता, कुटुंबातील सदस्य आणि समाजातील इतर घटकसुद्धा आपले गुरू असू शकतात. त्या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.”

या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. रसिका डाकवे, शर्वरी शितप, दिक्षा पड्याळ, रिया आंबेकर, आकांक्षा भुवड, वेदिका पाटील, नयना पवार, विवेक लोंढे, दुर्वेस भुवड, राज भुवड आणि इतर विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या विद्यार्थ्यांना प्रा. जड्याळ सर, प्रा. आयरे मॅडम, प्रा. सावंत मॅडम, प्रा. कांबळे मॅडम, प्रा. जड्याळ मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. श्रावणी कळंबाटे हिने केले, तर कु. दिपेश पोफळे याने उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

#GuruPurnima #TawalaiJuniorCollege #Education #TeacherAppreciation #StudentLife #नवीमुंबई #गुरुपौ

र्णिमा

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]