मँचेस्टर कसोटी: ऋषभ पंत दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट, भारताला मोठा धक्का

rushbh

मँचेस्टर कसोटी: ऋषभ पंत दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट, भारताला मोठा धक्का

भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टर येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा प्रमुख यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंत हा दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट झाला. चहापानानंतर लगेचच घडलेल्या या घटनेमुळे भारतीय संघाची चिंता वाढली आहे.

काय घडलं नेमकं?

भारताच्या डावातील 68 व्या षटकात ही घटना घडली. क्रिस वोक्स गोलंदाजी करत असताना, षटकातील चौथ्या चेंडू थेट पंतच्या उजव्या पायाच्या लहान बोटाला आदळला. चेंडू लागताच पंत वेदनेने ओरडला आणि त्याला तात्काळ मैदानाबाहेर जावे लागले. संघाचा फिजिओ धावत आला असता, पंतच्या बोटातून रक्त येत असल्याचे आणि ते सूजल्याचे दिसून आले.

या घटनेवेळी पंत 48 चेंडूंमध्ये 37 धावा काढून खेळत होता. त्याची दुखापत इतकी गंभीर होती की त्याला नीट चालताही येत नव्हते. वेदना असह्य झाल्याने त्याने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी भारताची धावसंख्या 67.4 षटकांत 3 बाद 212 अशी होती. पंतची अवस्था पाहून त्याला मैदानात उपलब्ध असलेल्या ॲम्ब्युलन्समधून थेट पवेलियनमध्ये नेण्यात आले.

पंतच्या दुखापतीची नेमकी स्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही, परंतु यामुळे भारतीय संघाची मधल्या फळीतील फलंदाजीची चिंता वाढली आहे. तो या कसोटीत पुन्हा फलंदाजी करू शकेल की नाही, याबाबत साशंकता आहे.


#RishabhPantInjury #EngVsInd #ManchesterTest #TeamIndia #CricketNews #ऋषभपंतदुखापत #भारतविरुद्धइंग्लंड #मँचेस्टरकसोटी #टीमइंडिया

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें