खळबळजनक: सुनेचा सासऱ्याला जेवणातून विष देण्याचा प्रयत्न, पतीलाही बाधा!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

खळबळजनक: सुनेचा सासऱ्याला जेवणातून विष देण्याचा प्रयत्न, पतीलाही बाधा!

कोसुंब रेवाळेवाडी येथे धक्कादायक घटना; देवरूख पोलिसांनी सुनेला केली अटक, संगमेश्वर हादरले.

संगमेश्वर ~  देवरूख,कोसुंब रेवाळेवाडी येथे सुनेने सासऱ्याला जीवे मारण्यासाठी जेवणातून केला विषप्रयोग; देवरूख पोलीसांनी सुनेला केली अटक; घटनेने संगमेश्वर तालुक्यात उडाली खळबळ
: सासरे घरातील कामे करण्यास सांगतात याचा राग मनात धरून एका सुनेने जेवणामध्ये विषारी द्रव्य टाकून सासऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब रेवाळेवाडी येथे घडली आहे. या विषप्रयोगाची बाधा सासऱ्यासह पतीलाही झाली असून, त्यांच्यावर रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सुनेवर देवरूख पोलीस ठाण्यात आज, शुक्रवारी, गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण संगमेश्वर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन जगन्नाथ सोलकर (वय ३४ वर्षे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. आरोपी महिलेचे नाव स्वप्नाली सचिन सोलकर (वय ३२ वर्षे) आहे. सचिन सोलकर आणि स्वप्नाली सोलकर यांचा विवाह १३ एप्रिल २०२५ रोजी झाला होता. स्वप्नालीला सासरे जगन्नाथ सोलकर हे घरातील कचरा काढणे, साफसफाई करणे आणि इतर कामे चांगल्या प्रकारे करण्यास सांगत असत. याच गोष्टीचा राग स्वप्नालीने मनात धरून जगन्नाथ सोलकर यांना जीवे ठार मारण्यासाठी जेवणामध्ये विषारी द्रव्य मिसळल्याचे सचिन सोलकर यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे. विशेष म्हणजे, हे जेवण सचिन सोलकर यांनीही खाल्ल्याने त्यांनाही विषबाधा झाली आहे. ही धक्कादायक घटना २२ जुलै रोजी रात्री ९.३० वाजता घडली.
जगन्नाथ सोलकर आणि सचिन सोलकर यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना त्वरित देवरूख ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अधिक उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान जगन्नाथ सोलकर आणि सचिन सोलकर यांना विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले. दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार, स्वप्नाली सोलकर हिच्यावर देवरूख पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी आणि पंचनामा केला. यावेळी देवरूख पोलीस निरीक्षक उदय झावरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत मसुरकर, हे. काँ. सचिन पवार, हे. काँ. सचिन कामेरकर, सहाय्यक पोलीस फौजदार श्रीकांत जाधव, महिला पोलीस कॉन्स्टेबल मंजुश्री पाडावे आदी उपस्थित होते.

#Hashtags:
#कोसुंबरेवाळेवाडी #विषप्रयोग #सासरा #सून #देवरूखपोलीस #अटक #संगमेश्वर #गुन्हेगारी #कौटुंबिकवाद #महाराष्ट्रपोलीस #ShockingNews #AttemptedMurder #FamilyDispute #CrimeNews #MaharashtraCrime #Ratnagiri #DevrukhPolice #Poisoning #BreakingNewsMarathi

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]