रत्नागिरीत ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश : ९० हजारांचे ब्राउन हिरोईन जप्त, दोन आरोपी अटकेत

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 


🔴 रत्नागिरीत ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश : ९० हजारांचे ब्राउन हिरोईन जप्त, दोन आरोपी अटकेत

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई – १७५ पुड्यांसह ब्राउन हिरोईनचा साठा जप्त

✍️ प्रतिनिधी | रत्नागिरी वार्ताहर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी अंमली पदार्थांच्या विक्री आणि तस्करीविरोधात मोठी कारवाई करत दोन संशयितांना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने २४ जुलै रोजी राजीवडा ते कर्ला रोडवरील बुडये मोहल्ला, रत्नागिरी येथे छापा टाकून सुमारे ९०,५०० रुपयांचा ब्राउन हिरोईन साठा जप्त केला.

गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान ११ ग्रॅम वजनाच्या ब्राउन हिरोईनच्या १७५ पुड्या आणि इतर विक्रीसाठी वापरण्यात येणारे साहित्य हस्तगत करण्यात आले.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वात पार पडली. गस्त घालत असताना दोन इसम संशयास्पद हालचाली करताना आढळले. पंचनामा करून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ड्रग्जचे पुडके सापडले.

मुस्तकीम युसुफ मुल्ला आणि मोहसीन नूरमोहम्मद फणसोपकर (दोघेही रा. राजीवडा) या दोघांविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 331/2025 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत सहभागी असलेल्या पथकामध्ये पो.उपनिरीक्षक संदीप ओगले, सहा. पो.फौ. सुभाष भागणे, पो.हवा. शांताराम झोटे, नितीन डोमणे, बाळू पालकर, वैष्णवी यादव, भैरवनाथ सवाईराम, सत्यजीत दरेकर, योगेश नार्वेकर, विनायक राजवैद्य आणि चालक पो.कॉ. अतुल कांबळे यांचा समावेश होता.

रत्नागिरी पोलीस विभागाने अंमली पदार्थ विरोधी कठोर धोरण स्वीकारले असून, अशा कारवायांमुळे जिल्ह्यातील बेकायदेशीर नेटवर्कला मोठा आळा बसण्याची शक्यता आहे.

 

 


 हॅशटॅग्स :

#RatnagiriPolice #DrugBust #BrownHeroin #LCBRatnagiri #CrimeNews #MaharashtraCrime #DrugFreeRatnagiri #BreakingNews #PoliceAction #अंमलीपदार्थविरोधातकारवाई #RatnagiriNews #MaharashtraPolice

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]