गणपती विशेष: कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर! एसटीची ३०% भाडेवाढ रद्द!

गणपती विशेष: कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर! एसटीची ३०% भाडेवाढ रद्द!

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एकेरी गट (एका दिशेचे) आरक्षणावर जाहीर केलेली ३० टक्के भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार आणि मुंबई तसेच उपनगरातील प्रवाशांच्या भावना लक्षात घेऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना ही भाडेवाढ रद्द करण्याच्या सूचना दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंढरपूर येथे जाहीर केले.

अलीकडेच राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या भाड्यामध्ये ३० टक्के वाढ केली होती, ज्यामुळे प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. विशेषतः गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना या भाडेवाढीचा मोठा फटका बसणार होता. प्रवाशांच्या या भावनांची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यात तात्काळ हस्तक्षेप केला. त्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना ही भाडेवाढ त्वरित मागे घेण्याचे निर्देश दिले.

या निर्णयामुळे गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जाणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. एसटी प्रवास आता अधिक परवडणारा होईल आणि चाकरमान्यांना कोणताही अतिरिक्त आर्थिक भार न सोसता आपल्या प्रियजनांसोबत सण साजरा करता येईल.

 

 

#Ganeshotsav2025 #STBus #FareHikeCancelled #KonkanTravel #GoodNews #Maharashtra #GauriGanpati #EknathShinde #PratapSarnaik #चाकरमानी #एसटीप्रवास #भाडेवाढरद्द #कोकण #गणेशो

त्सव

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें