ज्याने पोहायला शिकवलं, त्याला बुडवण्याचा प्रयत्न करू नका” – सचिन बाईत यांचा शिंदे गटाला इशारा…

SACHIN

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

ज्याने पोहायला शिकवलं, त्याला बुडवण्याचा प्रयत्न करू नका” – सचिन बाईत यांचा शिंदे गटाला इशारा

 

आबलोली (गुहागर): गुहागर तालुक्यातील हेदवतड येथे झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या (उभाठा) जाहीर मेळाव्यात तालुकाप्रमुख सचिन बाईत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. याच सभागृहात शिंदे गटाने घेतलेल्या मेळाव्याला उत्तर देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.


 

“सत्तेसाठी गेलेल्यांना बुडवू शकतो”

 

सचिन बाईत यांनी आपल्या भाषणात शिंदे गटात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना थेट इशारा दिला. “ज्याने पोहायला शिकवले, त्याला बुडवण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा तोही तुम्हाला बुडवू शकतो,” असे ते गरजले. सत्तेसाठी पक्ष सोडणाऱ्यांवर त्यांनी निशाणा साधला आणि आम्ही सत्यासाठी उद्धव ठाकरेंसोबत आहोत, असे स्पष्ट केले. या मेळाव्यात मोठी गर्दी होती, जी आमदार भास्कर जाधव यांच्या पाठीशी गट भक्कमपणे उभा असल्याची साक्ष देते, असे बाईत म्हणाले.


 

मच्छीमार समाजाला आवाहन

 

बाईत यांनी मच्छीमार समाजातील कार्यकर्त्यांनाही आवाहन केले. विरोधकांनी मच्छीमार समाज आपल्यापासून दुरावत असल्याचा अपप्रचार केला, परंतु आज व्यासपीठावर मच्छीमार समाजाचे नेते उपस्थित आहेत, हे सत्याचे प्रतीक आहे. त्यांनी मच्छीमार समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी भास्कर जाधव यांनी केलेल्या प्रयत्नांची आठवण करून दिली. “मच्छीमार बांधवांनी अफवांना बळी पडू नये,” असे आवाहनही त्यांनी केले.

उपस्थित मान्यवर

या मेळाव्याला आमदार भास्कर जाधव, विक्रांत जाधव, सहदेव बेटकर, सुभाष मोहिते, विनायक मुळे यांच्यासह अनेक प्रमुख नेते आणि हजारो महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. मेळाव्याचे प्रास्ताविक विनायक मुळे यांनी केले, तर विलास गुरव यांनी सूत्रसंचालन केले.



 

 

#UddhavBalasahebThackeray #SachinBait #Guhagar #ShindeSena #BhaskarJadhav #MaharashtraPolitics

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]