तवसाळमध्ये मशाल हाती घेत शिवसेनेत पुनरागमन!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

🔥 तवसाळमध्ये मशाल हाती घेत शिवसेनेत पुनरागमन!

आ. भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा, शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना (UBT) मध्ये प्रवेश

वेळणेश्वर (सुजित सुर्वे,प्रतिनिधी) | दि. 6 ऑगस्ट 2025

पडवे जिल्हा परिषद गटातील तवसाळ व परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जोरदार पुनरागमन करत मशाल हाती घेतली. हा मेळावा आमदार भास्कर शेठ जाधव यांच्या उपस्थितीत वेळणेश्वर येथे पार पडला.

गेल्या पंधरा दिवसांपूर्वी याच ठिकाणी काही पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश सोहळा पार पडला होता. त्याच्या पार्श्वभूमीवर आजचा मेळावा अत्यंत महत्वाचा ठरला.

भास्कर शेठ जाधव यांचे आक्रमक भाषण, कार्यकर्त्यांचे मन जिंकले

यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या नेहमीच्या ठसकेबाज आणि मुद्देसूद भाषणातून विरोधकांना चिमटे काढत, पक्ष सोडून गेलेल्यांची गद्दारी हृदयद्रावक पद्धतीने उघड केली.

“आपण एवढं सर्व काही दिलं, तरीही काही जणांनी केवळ स्वहितासाठी पक्षत्याग केला. हे दु:खद आणि अनाकलनीय आहे,” असे ते म्हणाले.

“पण आज जेवढ्या मोठ्या संख्येने खरे शिवसैनिक परत आलेत, ते पाहून मी भारावून गेलो आहे. तुमच्यासाठी मी सदैव उभा आहे आणि राहीन,” असे आश्वासन त्यांनी दिले.

भाजप, राष्ट्रवादी, शिंदे गटातील अनेकांचा प्रवेश

या मेळाव्यात तवसाळ येथील विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक शाम सहदेव गडदे, भाजप युवा अध्यक्ष किरण गडदे, रवी गडदे, शिंदे गटाचे उमेश महाकाळ तसेच अनेक भाजपा, राष्ट्रवादी व शिंदे गटातील कार्यकर्ते यांनी भास्कर जाधव यांच्या कार्यशैलीवर प्रभावित होऊन शिवसेना (UBT) मध्ये प्रवेश केला.

नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

या वेळी कामिल तवसाळकर यांची शाखाप्रमुख, तर विघ्नेश गडदे यांची उपशाखाप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली.

कार्यक्रमाला मोठी उपस्थिती……

या कार्यक्रमाला पडवे जिल्हा परिषद गटातील असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

तालुका प्रमुख सचिन बाईत, रवी आंबेकर, पूर्वी निमुणकर, श्वेता गडदे, जगदीश गडदे, विनोद गडदे, विजय मोहिते,दिलीप सुर्वे सुजेंद्र सुर्वे, पराग सुर्वे शरद सुर्वे, पंकज सुर्वे आदी पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्ते यांनी हिं सक्रिय सहभाग घेतला.

 


 Hashtags 

#ShivsenaUBT
#भास्करजाधव
#TavasalPolitics
#PoliticalComeback
#मशालहाती
#UddhavThackeray
#ShivSainikReturns
#गडदेपरिवार#शक्तिप्रदर्शन#KonkanPolitics
#RatnagiriNews#शिवसेना
#TalasariUpdates#गद्दारीविरोधात
#YouthInPolitics#शाखाप्रमुख#VighneshGadade#LocalLeadership#PadvheZPGat#ShindeGroupExit


 


 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]