लोकनेते शामराव पेजे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनवल्या स्व-हस्तकौशल्यातून राख्या

लोकनेते शामराव पेजे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनवल्या स्व-हस्तकौशल्यातून राख्या

रत्नागिरी – संदीप शेमणकर
श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी पेजे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वहस्तकौशल्यातून राख्या बनवल्या. रक्षाबंधन या सणानिमित्त भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या राख्या
राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी स्व-हस्तकौशल्यातून तयार करून त्याचे व्यावसायिक रूपांतर कसे करावे. याचे प्रशिक्षण कार्यक्रम अधिकारी प्राध्यापिका कल्पना मेस्त्री आपल्या महाविद्यालयातील स्वयंसेवकांना दिले. स्वयंसेवक या उपक्रमात आनंदाने सहभागी झाले.बांबू पासून “इको फ्रेंडली राखी” कशी तयार करावी. पर्यावरण प्रदूषण कसे टाळावे याबाबत देखील उचित मार्गदर्शन केले. सुमारे ३०० राख्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी बनवल्या. या उपक्रमासाठी सर्व प्राध्यापक वृंद यांचे सहकार्य लाभले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रमोद वारीक सर यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या व प्रोत्साहन पर मार्गदर्शन केले.


RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें