शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे प्रणीत “संतोष प्रतिष्ठान”आयोजित महिलांसाठी मंगळागौरी स्पर्धा उत्साहात संपन्न

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे प्रणीत
“संतोष प्रतिष्ठान”आयोजित महिलांसाठी मंगळागौरी स्पर्धा उत्साहात संपन्न

नालासोपारा – संदीप शेमणकर
रविवार दिनांक १०ऑगस्ट रोजी, गॅलॅक्सी हॉल येथे महिलांसाठी श्रावण महिन्यातील मंगळागौर स्पर्धा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमा साठी जिल्हा प्रमुख प्रवीण म्हाप्रळकर, जिल्हा संघटक सौ.किरण चेंदवणकर तसेच सर्व शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी ,कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमा साठी परीक्षक म्हणून सौ.सरिता खोराटे, सौ.स्वाती नाईक, भ.मीना ठाकोर यांचे सहकार्य लाभले.
प्रथम विजेता संघ – जिजाऊ मंगळागौर संघ,
द्वितीय विजेता संघ – शिवाज्ञा मंगळागौर संघ,
तृतीय विजेता संघ – मायबोली मंगळागौर संघ,
उत्तेजनार्थ – स्वामींनी मंगळागौर संघ, रणरागिणी मंगळागौर संघ
उत्कृष्ट नृत्यकार – १)सौ.ज्योस्नापांचाळ(स्वामींनी संघ)
२.सौ. अपर्णा गायकवाड(रणरागिणी)
उपस्थित सर्व मान्यवर आणि मंगळागौर स्पर्धा संघांचे आभार व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सर्व पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें