लांजा कुक्कुटपालन संस्था विकासासाठी कटिबद्ध – आमदार किरण सामंत यांचे आश्वासन

लांजा कुक्कुटपालन संस्था विकासासाठी कटिबद्ध – आमदार किरण सामंत यांचे आश्वासन

स्थानिक पातळीवर उद्योगनिर्मिती व रोजगारनिर्मितीचे नवे मार्ग खुले करण्यासाठी प्रयत्नशील राहणार – सामंत.

लांजा (प्रतिनिधी) – रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामस्थांना रोजगार मिळावा व शाश्वत उद्योग उभे राहावेत यासाठी लांजा कुक्कुट व्यवसायिक संस्थेच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन आमदार किरण सामंत यांनी दिले. माजी आमदार स्व. शिवाजीरााव सामंत यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त लांजा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

आमदार सामंत म्हणाले की,
“स्व. शिवाजीरााव सामंत यांनी शेतकरी, कामगार व ग्रामस्थांच्या जीवनमान उंचावण्यासाठी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे लांजा तालुक्यात कुक्कुट व्यवसायिक संस्था स्थापन झाली. या संस्थेमुळे अनेकांना रोजगार व आर्थिक बळ मिळाले आहे. याला अधिक आधुनिक तंत्रज्ञान, शासनाच्या योजना व नवे प्रकल्प जोडून सक्षम बनवण्याचे प्रयत्न केले जातील.”

या कार्यक्रमास मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये विवेक सावंत, ज्येष्ठ कार्यकर्ते हरिश्चंद्र गिव्हे, अॅड. सुजित झिमन, लांजा न्यू एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम तथा भाऊ वंजारे, जिल्हा बँकेचे संचालक महेश खामकर, माजी नगराध्यक्ष मनोहर बाईड, कुक्कुटपालन संस्थेचे संचालक सचिन भिंगाडे, प्रवीण जेडे, राजू धावणे यांचा समावेश होता.

तसेच सामाजिक- सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर देखील उपस्थित होते. लेखक-सिने-नाट्य अभिनेते अमोल रेडीज, सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रातील सुप्रभ लाड, सामाजिक-सांस्कृतिक कार्यकर्ते महेश दामणे, शिक्षण, कला व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनीही उपस्थिती दर्शवली.

कार्यक्रमात सर्व मान्यवरांनी स्व. शिवाजीरााव सामंत यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी स्व. सामंत यांचे योगदान अमूल्य असल्याचे यावेळी सर्वांनी नमूद केले.



हॅशटॅग्स :

#लांजा #कुक्कुटपालन #रत्नागिरी #आमदारकिरणसामंत #शेतकरीविकास #रोजगार #सहकारचळवळ #सामाजिककार्य #संस्कृती

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें