भारतीय पंतप्रधान ग्रेट; ट्रम्प यांच्याकडून भरभरुन कौतुक; मोदींकडूनही मैत्रीचा हात; भारत-अमेरिकेतील वाद निवळला

 

💥💥 आंतरराष्ट्रीय वार्ता

🟣 भारतीय पंतप्रधान ग्रेट; ट्रम्प यांच्याकडून भरभरुन कौतुक; मोदींकडूनही मैत्रीचा हात; भारत-अमेरिकेतील वाद निवळला

नवी दिल्ली : रशियाच्या तेलावरील शुल्क आणि खरेदीबाबत अमेरिका व भारत यांच्यात तणाव निर्माण झाला होता. मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नरमले असून त्यांनी मोदींचे भरभरून कौतुक केले आहे. “भारत आणि अमेरिकेत विशेष संबंध आहेत. मी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच मित्र राहू, ते एक महान पंतप्रधान आहेत,” असे त्यांनी म्हटले.

यावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भावना आणि आमच्या संबंधांबद्दलच्या सकारात्मक मूल्यांकनाचे आम्ही मनापासून कौतुक करतो. भारत आणि अमेरिकेमध्ये अतिशय सकारात्मक, दूरदर्शी आणि जागतिक धोरणात्मक भागीदारी आहे.”

शुक्रवारी ओव्हल ऑफिसमध्ये माध्यमांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, “मी नेहमीच मोदींचा मित्र राहीन, ते उत्तम पंतप्रधान आहेत. पण सध्या ते जे करत आहेत ते मला आवडलेलं नाही. तरी भारत-अमेरिकेत एक विशेष नातं आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. अशा गोष्टी घडत असतात.”

दरम्यान, ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी मोदी, पुतिन आणि शी जिनपिंग यांचा एक जुना फोटो शेअर करत भारत-रशिया समीकरणांवर नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी लिहिले होते की, “असे दिसते की आपण भारत आणि रशियाला चीनच्या हाती हरलो आहोत. त्यांचे भविष्य दीर्घ आणि समृद्ध होवो!”

याच पोस्टवर पुढे ट्रम्प म्हणाले होते की, “भारताने रशियाकडून इतके तेल खरेदी करणे निराशाजनक आहे. आम्ही भारतावर 50 टक्के कर लादला आहे. मात्र माझे मोदींशी संबंध खूप चांगले आहेत. ते काही महिन्यांपूर्वीच येथे आले होते.”

 

 


🏷️ हॅशटॅग्स :

#Trump #NarendraModi #IndiaUSRelations #InternationalNews #USIndia #DonaldTrump #GlobalPolitics

📸 फोटो 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें