राजकारणात नवी समीकरणं? 🟣 ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार? दसरा मेळाव्यात उद्धव-राज ठाकरेंची संयुक्त उपस्थिती शक्य!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

💥 राजकारणात नवी समीकरणं?

🟣 ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार? दसरा मेळाव्यात उद्धव-राज ठाकरेंची संयुक्त उपस्थिती शक्य!

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या भेटीगाठींना वेग आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी राज ठाकरे मातोश्रीवर शुभेच्छा देण्यासाठी गेले होते. त्यानंतर गणेशोत्सवाच्या काळात उद्धव ठाकरे स्वतः शिवतीर्थ येथे जाऊन राज ठाकरेंच्या घरी गणरायाचे दर्शन घेतले.

आता या भेटीगाठींचा परिणाम दसरा मेळाव्यावरही उमटू शकतो. उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंना दसरा मेळाव्यात मानाचं स्थान दिलं जाण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.

शिवसेना (उबाठा) नेते आणि विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी याबाबत स्पष्ट संकेत दिले. “दसऱ्याला तुम्हाला चांगली बातमी मिळेल. कदाचित राज ठाकरेंना आमच्या पक्षाकडून दसरा मेळाव्याचं निमंत्रण दिलं जाऊ शकतं,” असे सूचक विधान त्यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना केले.

👉 या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

 

 

#ठाकरेबंधू #UddhavThackeray #RajThackeray #दसरा_मेळावा #महाराष्ट्रराजकारण #शिवसेना #मनसे

📸 फोटो 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]