श्री. माधव अंकलगे यांना “Teacher Excellence Award

श्री. माधव अंकलगे यांना “Teacher Excellence Award

रत्नागिरी : प्रतिनिधी निलेश रहाटे
वाटद कवठेवाडी (ता. रत्नागिरी) येथील शिक्षक श्री. माधव विश्वनाथ अंकलगे यांना रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन तर्फे देण्यात येणारा Teacher Excellence Award (शिक्षक उत्कृष्टता पुरस्कार) प्रदान करण्यात आला आहे.

हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या वैयक्तिक यशाचा सन्मान नसून, विद्यार्थ्यांच्या घडणीत त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल आहे. शिक्षणक्षेत्रातील त्यांचे योगदान आणि समाजाभिमुख कार्यामुळे त्यांना हा बहुमान प्राप्त झाला आहे.

हा पुरस्कार प्रदान करण्याच्या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनच्या अध्यक्षा डॉ. स्वपना संदीप करे, सचिव रोट. राजेंद्र कदम व कोषाध्यक्ष रोट. सिताराम सावंत उपस्थित होते.

श्री. अंकलगे सरांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Nilesh Rahate
Author: Nilesh Rahate

???? निलेश रहाटे ???? मिडिया प्रतिनिधि - रत्नागिरी वार्ताहर. ता. जिल्हा - रत्नागिरी

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें