पत्रकारावर पोलिसांचा हात; मुंबई मराठी पत्रकार संघाचा निषेध!

💥💥 ब्रेकींग न्यूज

🟣 पत्रकारावर पोलिसांचा हात; मुंबई मराठी पत्रकार संघाचा निषेध!

 

मुंबई :

साम टीव्हीचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांना वार्तांकन करत असताना गाडी उभी करण्यावरून झालेल्या क्षुल्लक शाब्दिक बाचाबाचीत सहाय्यक पोलिस निरीक्षक शांताराम नाईक यांनी थेट कानाखाली मारल्याची घटना समोर आली आहे.

 

या प्रकाराचा मुंबई मराठी पत्रकार संघाने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, कार्यवाह शैलेंद्र शिर्के यांनी नाईक यांच्यावर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मिडिया परिषदेचे एस. एम. देशमुख यांनीही या घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

 

पत्रकार विकास मिरगणे हे त्यांच्या प्रामाणिक वार्तांकनासाठी ओळखले जातात. पार्किंगसारख्या किरकोळ कारणावरून थेट कानशिलात लगावणे हा अतिरेक असून पत्रकार संघटनांनी एकमुखाने निषेधाचा सुर आळवला आहे.

 

#पत्रकारहल्ला #मुंबई #PoliceVsMedia #BreakingNews

 

📷 फोटो

 

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें