नागरिकांना सरकारी सेवा आता व्हॉट्सअपवर!

 

💥 नागरिकांना सरकारी सेवा आता व्हॉट्सअपवर!

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा; 26 जानेवारीपासून 200 योजना डिजिटाइज पद्धतीने उपलब्ध

 

मुंबई : नागरिकांना सरकारी कार्यालयांचे उंबरठे न ठोठावता सेवा मिळावी, यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केले की, नागरिकांना आता सरकारी सेवा व योजना थेट व्हॉट्सअपवर उपलब्ध होणार आहेत.

 

फडणवीस म्हणाले, “मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तेव्हा सेवा हमी कायदा केला होता. आता ‘आपले सरकार’ या यंत्रणेचे नवे व्हर्जन सुरू करत असून, यासाठी समग्र नावाच्या संस्थेशी करार केला आहे. डिजिटाइज पद्धतीने सेवा देण्याचा हा मोठा प्रयत्न असून, नागरिकांच्या मागणीनुसार सेवा व योजना देण्यात येणार आहेत.”

 

👉 महत्वाचे टप्पे :

 

पहिला टप्पा 26 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार.

 

200 सेवा व योजना 26 जानेवारीपर्यंत उपलब्ध.

 

सर्व सेवा 1 मेपर्यंत डिजिटाइज पद्धतीने सुरू.

 

नागरिकांना केलेल्या अर्जाची रिअल-टाइम स्थिती पाहता येणार.

 

 

मुख्यमंत्री म्हणाले की, डिजिटाइज सेवेमुळे शासन दरबारी मारावे लागणारे खेटे कमी होतील आणि प्रक्रिया पारदर्शक बनेल.

 

दरम्यान, राज्यात गुंतवणुकीच्या बाबतीतही महाराष्ट्राने आघाडी घेतल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत 1 लाख 50 हजार कोटींचे करार झाले असून, त्यातून 47 हजार रोजगार निर्माण होणार आहेत. रायगडमध्ये डेटा सेंटर, नाशिक-नंदुरबारमध्ये 2100 कोटींची गुंतवणूक, विदर्भात रिलायन्स फूड पार्क व शीतपेय पार्क, तर अदानी समूहाकडून 70 हजार कोटींची गुंतवणूक होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

 

 

 

🟣 हॅशटॅग्स :

 

#WhatsAppServices #MaharashtraGovernment #CMDevendraFadnavis #DigitalIndia #GovernmentSchemes #BreakingNews

 

 

 

📸 फोटो

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें