जैतापूरचा अभिनेता सुनिल करगुटकर हिंदी चित्रपट फकीरियत मधून झळकणार.

जैतापूरचा अभिनेता सुनिल करगुटकर हिंदी चित्रपट फकीरियत मधून झळकणार.

 

✍️राजू सागवेकर | राजापूर

 

राजापूर तालुक्यातील जैतापूरचा अभिमान असलेला अभिनेता सुनिल करगुटकर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला हिंदी चित्रपट फकीरियतमधून येत आहे. लहानपणापासूनच रंगभूमीवर अभिनयाचे बाळकडू घेतलेल्या सुनिलने आतापर्यंत वस्त्रहरण, रात्रीस खेळ चाले, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय अशा अनेक गाजलेल्या व्यावसायिक नाटकांपासून ते चित्रपटांपर्यंत प्रवास केला आहे.

 

आध्यात्मिक प्रवासावर आधारित फकीरियत हा चित्रपट येत्या १९ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असून यात सुनिल करगुटकर महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन संतोष मांजरेकर यांनी केले असून निर्मिती भद्रबाहू क्रिएशन्स एलएलपी अंतर्गत झाली आहे. कथा लेखिका अनुजा जानवलेकर यांच्या चिरूट जलती है व अध्यात्म एक विद्रोह एक क्रांती या पुस्तकांवर आधारित आहे. पटकथा व संवादलेखन अनिल पवार यांनी अनुजा जानवलेकर यांच्या सहकार्याने केले आहे.

 

चित्रपटामध्ये महावतार बाबाजींच्या शिकवणीचा आणि त्यांच्या शिष्याच्या आध्यात्मिक प्रवासाचा आढावा घेतला असून प्रेक्षकांना आत्मशोधाचा नवा अनुभव देणारा ठरणार आहे.

 

या सिनेमात मराठमोळी अभिनेत्री दीपा परब मुख्य भूमिकेतून हिंदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करीत आहे. त्याचबरोबर उदय टीकेकर, संदेश जाधव, विनित शर्मा, नयन जाधव, सुनिल करगुटकर, अक्षय वर्तक, नुपूर दुधवडकर यांच्याही भूमिका आहेत. विशेष भूमिकेत संतोष जुवेकर झळकणार आहेत. छायाचित्रण अजित रेड्डी यांचे असून संकलन निलेश गावंड यांनी केले आहे.

 

चित्रपटाचा ट्रेलर व संगीत लाँच सोहळा ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल आणि अभिनेत्री मेधा मांजरेकर यांच्या उपस्थितीत अलीकडेच दिमाखात पार पडला.

 

फकीरियत या महत्त्वपूर्ण चित्रपटामुळे सुनिल करगुटकरचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या अभिनयाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें