पीएम श्री.जवाहर नवोदय विद्यालय पडवे येथे पालक,शिक्षक संघ परिषदेच्या सदस्यपदी सामाजिक कार्यकर्ते दिनेश रुके यांची नियुक्ती

पीएम श्री.जवाहर नवोदय विद्यालय पडवे येथे पालक,शिक्षक संघ परिषदेच्या सदस्यपदी सामाजिक कार्यकर्ते दिनेश रुके यांची नियुक्ती

आबलोली (संदेश कदम)

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पडवे येथील पीएम श्री. जवाहर नवोदय विद्यालय राजापूर पडवे या विद्यालयाची सन 2025 – 26 शैक्षणिक वर्षातील पार पडलेल्या शिक्षक पालक संघाची परिषद नुकतीच उत्साहात संपन्न झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते दिनेश काशिनाथ रुके यांची दापोली तालुक्यातून पहिल्यांदाच पीएम श्री. जवाहर नवोदय विद्यालय पडवे महाविद्यालयाच्या सदस्यपदी बिनविरोध नियुक्ती करण्यात आली आणि दिनेश रुके यांना पालकांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झाली. या नियुक्ती मुळे दापोली तालुक्यातून दिनेश रुके यांचेवर धार्मिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विविध स्तरातून अनेक मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.

यावेळी पीएम श्री. जवाहर नवोदय विद्यालय पडवे या विद्यालयाचे प्राचार्य आणि संघ परिषदेचे अध्यक्ष मान. एम. बसवराज यांनी सर्वांचे स्वागत करून संघ परिषदेला सुरुवात केली. त्यानंतर प्रमोद जाधव यांनी पालक संघ परिषदेच्या सदस्य पदी दापोली तालुक्यातून दिनेश रुके यांच्या नावाची सूचना मांडली या सूचनेला ओणकर यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर प्राचार्य एम.बसवराज यांनी दिनेश रुके यांची पालक, शिक्षक संघाच्या परिषदेवर सदस्य पदी नियुक्ती झाल्याचे जाहीर केले.सामाजिक कार्यकर्ते दिनेश रुके यांच्या दोन्ही मुलींची जवाहर नवोदय विद्यालय पडवे येथे सिलेक्शन झाल्याने त्या या विद्यालयात शिक्षण घेत आहेत त्यामुळेच सामाजिक कार्यकर्ते दिनेश रुके यांची पीएम श्री. जवाहर नवोदय पडवे येथे पालक,शिक्षक संघाच्या परिषदेच्या सदस्य पदी नियुक्ती झाली. या संपूर्ण परिषदेचे सूत्रसंचालन नागेश शेंडगे यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक वृंद आणि पालक बहूसंख्येने उपस्थित होते.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें