शिवसेना उबाठा पक्षाचे तालुकाप्रमुख सचिनशेठ बाईत यांचा सडे जांभारी गावभेट दौरा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शिवसेना उबाठा पक्षाचे तालुकाप्रमुख सचिनशेठ बाईत यांचा सडे जांभारी गावभेट दौरा

आबलोली (संदेश कदम)

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे गुहागर तालुका प्रमुख सचिनशेठ बाईत यांनी गणपती उत्सवामध्ये सडे जांभारी गावातील सत्य सेवा मंडळ ग्रुप नं 3 मातोश्री सभागृहाला भेट देऊन ग्रामस्थांसमवेत विविध विकासकामांबद्दल चर्चा केली.सालाबादप्रमाणे याही वर्षी गणपती उत्सवामध्ये गावभेट दौऱ्याचे आयोजन करून गावातील मंडळांना भेटी दिल्या .तत्पूर्वी त्यांनी गावातील छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या स्मारकाला अभिवादन करून नियोजित दौऱ्याला सुरुवात केली.

श्री सचिनशेठ बाईत यांनी 2 वर्षापूर्वी याच स्मारकाच्या संरक्षण वॉलच्या कामासाठी आर्थिक सहाय्य केले होते.निस्वार्थी वृत्तीने त्यांचे हे सामाजिक कार्य आजही गावोगावी पहायला मिळते.या गावभेट कार्यक्रमात सत्य सेवा मंडळ ग्रुप नं 3 मातोश्री मंडळाला भेट देऊन त्यांनी विविध विकासकामांबदल चर्चा करून नियोजित कामे लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन दिले

या कार्यक्रमसाठी सरपंच श्रीमती. वनिता डिंगणकर ग्रामस्थ महेश माटल, सुरेश घेवडे,सुरेश दावडे ,गंगाराम पागडे, तानाजी आग्रे, पांडुरंग वेलुंडे ,सत्य सेवा मंडळ ग्रुप नं 3 चे अध्यक्ष शंकर दावडे, महादेव घेवडे, बबन दावडे,मंगेश दावडे, प्रकाश दावडे,जयवंत दावडे, शंकर वेलुंडे, केशव घेवडे,गणपत दावडे, संदीप दावडे, संतोष वेलुंडे,संतोष दावडे,प्रीती दावडे,शालिनी बारस्कर आदी महिला – ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]