आ. भास्करशेठ जाधव यांनी घेतली कोत्रेवाडी उपोषणकर्त्यांची भेट

🙏 आ. भास्करशेठ जाधव यांनी घेतली कोत्रेवाडी उपोषणकर्त्यांची भेट

 

घनकचरा प्रकल्पाविरोधात ३४ दिवसांपासून सुरू आहे आंदोलन

 

लांजा प्रतिनिधी – जितेंद्र चव्हाण

लांजा नगरपंचायतीने शहरातील कोत्रेवाडी येथे वस्तीजवळच घनकचरा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामस्थांनी जोरदार विरोध सुरू केला आहे. या प्रकल्पाविरोधात कोत्रेवाडीतील ग्रामस्थ गेले ३४ दिवसांपासून उपोषणावर बसलेले आहेत.

 

या आंदोलनाची माहिती मिळताच आमदार भास्करशेठ जाधव यांनी प्रत्यक्ष उपोषणस्थळी भेट देऊन ग्रामस्थांची विचारपूस केली. त्यांनी उपोषणकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व त्यांच्या समस्येची दखल घेत तातडीने जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांना फोन करून या विषयात मार्ग काढावा, अशी सूचना केली. जिल्हाधिकाऱ्यांनीही तत्काळ यास सकारात्मक प्रतिसाद दिला.

 

ग्रामस्थांनी आमदारांच्या भेटीमुळे आंदोलनाला बळ मिळाल्याचे सांगितले असून, “स्थानिकांचा विरोध लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात यावा,” अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली आहे.

 

 

 

📌 हॅशटॅग्स:

 

#लांजा #कोत्रेवाडी #घनकचरा_प्रकल्प #उपोषण #रत्नागिरी #भास्करशेठजाधव

 

📷

 

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें