जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद-रायवाडी येथे नवीन मुख्याध्यापिकांचे स्वागत

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद-रायवाडी येथे नवीन मुख्याध्यापिकांचे स्वागत

 

प्रतिनिधी :- निलेश रहाटे

ता. रत्नागिरी मधील वाटद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाटद-रायवाडी येथे नवीन शिक्षकांचा व मुख्याध्यापिकांचा स्वागत समारंभ आनंदाच्या वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात शाळेला नवीन मुख्याध्यापिका म्हणून लाभलेल्या सौ.महामाया सुर्वे मॅडम यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले.

 

स्वागत समारंभ शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला. यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितीन झगडे, उपाध्यक्षा चेतना जोशी, शिक्षणतज्ञ विनोद वरवटकर, अंगणवाडी सेविका किंजळे बाई व अंगणवाडी मदतनीस जाधव बाई यांनी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्याध्यापिकांचे स्वागत केले.

 

तसेच या कार्यक्रमात शाळा समितीतील सदस्य व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपस्थितांमध्ये अनुष्का पिंपुटकर, भालचंद्र पिंपुटकर, दिपक आलीम, दिपक कदम, सोनाक्षी कदम, मानसी जाधव, सुलक्षणा जाधव, भारती किंजळे, सानिका आलीम, आरुषी वरवटकर यांचा समावेश होता.

 

यावेळी विद्यार्थ्यांनीही आपल्या नवीन मुख्याध्यापिकांचे उत्स्फूर्त स्वागत केले. शाळेचे प्रतीक माने सर, आकांक्षा आलीम व नारायण बंडबे यांचे विशेष योगदान या कार्यक्रमात राहिले.

 

कार्यक्रमाचे वातावरण आनंददायी होते आणि उपस्थित सर्वांनी नवीन मुख्याध्यापिका सौ.महामाया सुर्वे मॅडम यांना आगामी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें