अजिंक्य मित्र मंडळ रूण-कोसमवाडीचा सार्वजनिक नवरात्र उत्सव सुरू

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अजिंक्य मित्र मंडळ रूण-कोसमवाडीचा सार्वजनिक नवरात्र उत्सव सुरू

२०११ पासून दरवर्षी भक्तिमय वातावरणात नवरात्र उत्सवाचे आयोजन

लांजा प्रतिनिधी जितेंद्र चव्हाण :
लांजा तालुक्यातील रूण-कोसमवाडी येथील अजिंक्य मित्र मंडळ मागील १५ वर्षांपासून सार्वजनिक नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. २०११ साली सुरू झालेला हा उत्सव आज परिसरातील एक महत्त्वाचा सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम ठरला आहे.

या वर्षीचा नवरात्र महोत्सव सोमवार, २२ सप्टेंबर २०२५ पासून शुक्रवार, ३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत श्री सद्गुरु साईबाबा सभागृह, कोसमवाडी येथे आयोजित केला आहे. देवीचे आगमन वाजतगाजत ढोल-ताशांच्या गजरात झाले असून भाविकांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरण निर्माण झाले.

मंडळाच्या वतीने गुरुवार, २ ऑक्टोबर (विजयादशमी) रोजी सार्वजनिक श्री सत्यनारायणाची पूजा सायंकाळी करण्यात येणार आहे. तसेच २२ सप्टेंबरपासून ३ ऑक्टोबरपर्यंत दररोज रात्री ८:३० ते १०:०० या वेळेत महाप्रसाद आयोजित आहे.

मंडळाचे अध्यक्ष श्री दत्ताराम सूर्यकांत सावंत व सरचिटणीस श्री मंगेश गणपत सावंत यांनी परिसरातील सर्व भक्तगणांना या उत्सवात सहभागी होऊन देवीचे दर्शन घेण्याचे आवाहन केले

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]