सरोदे समाज युवा संघटनेतर्फे भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

 

🔴 सरोदे समाज युवा संघटनेतर्फे भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

 

पहिल्याच उपक्रमात तब्बल १५२ रक्तदात्यांचा सहभाग; दापोलीत समाजसेवेचे दर्शन

 

दापोली (वार्ताहर) :

दापोली तालुक्यातील सरोदे समाज युवा संघटना, दापोली शहर यांच्या वतीने दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोजी भागवत हॉस्पिटल, दापोली येथे भव्य रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

संघटनेच्या विविध उपक्रमांपैकी हा पहिलाच उपक्रम असूनदेखील तब्बल १५२ रक्तदात्यांनी शिबिरात सहभाग नोंदवला. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या भावनेतून विविध स्तरातील रक्तदात्यांनी समाजसेवेचे दर्शन घडवले.

 

शिबिराचे उद्घाटन डॉ. तुषार भागवत यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. माधवी साठे, संतोष अबगुल प्रतिष्ठान दापोली प्रमुख श्री. रुपेश वाईकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

 

या शिबिरासाठी दापोली मेडिकल कॉलेज, संतोष अबगुल प्रतिष्ठान तसेच सायन ब्लड बँक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 

रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुयोग भागवत, सचिव संदीप क्षीरसागर यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच प्रकल्प संचालक रुपेश रसाळ, प्रकल्प समन्वयक शुभंकर यादव व संघटनेच्या सर्व सभासदांनी उत्साहाने काम पाहिले.

 

 

 

🔖 हॅशटॅग्स :

 

#सरोदेसमाज #रक्तदान #दापोली #समाजसेवा #BloodDonation #RatnagiriVartahar

 

 

 

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें