मनसे गुहागरच्या वतीने जानवळे शाळा नं. १ शाळेतील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त चंद्रकांत बेलेकर यांचा सत्कार

मनसे गुहागरच्या वतीने जानवळे शाळा नं. १ शाळेतील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त चंद्रकांत बेलेकर यांचा सत्कार

आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील जानवळे शाळा नं. १ शाळेतील शिक्षक चंद्रकांत बेलेकर यांना रत्नागिरी जिल्हा परिषदच्या वतीने सन २०२४-२५ या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागरचे संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे संपर्क कार्यालय शृंगारतळी येथे मनसे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मनसे गुहागरच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त चंद्रकांत बेलेकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी मनसेमय हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर,तालुका सचिव प्रशांत साटले,शहर अध्यक्ष अभिजित रायकर,उपतालुका अध्यक्ष अमित खांडेकर, जितेंद्र साळवी, विद्यार्थी सेना गुहागर तालुका अध्यक्ष प्रथमेश रायकर, विभाग अध्यक्ष प्रसाद विखारे,कौढर काळसूर शाखा अध्यक्ष सुनिल मुकनाक,मळण शाखा अध्यक्ष मंगेश धामणस्कर, तसेच असंख्य महाराष्ट्र सैनिक व महीला पदाधिकारी आणि शिक्षक वृंद उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें