शृंगारतळी जानवळे फाट्यावरून गावात जाणाऱ्या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी – मनसेचे सा.बां. उपविभाग गुहागरला निवेदन

शृंगारतळी जानवळे फाट्यावरून गावात जाणाऱ्या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी – मनसेचे सा.बां. उपविभाग गुहागरला निवेदन

आबलोली (संदेश कदम)

गुहागर तालुक्यातील शृंगारतळी जानवळे फाट्यावरून गावात जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती त्वरित करण्यात यावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागर यांना नुकतेच निवेदन सादर केले आहे

या निवेदनात विनोद जानवळकर यांनी असे म्हटले आहे की, जानवळे गावात जाणाऱ्या जानवळे फाटा येथूनचा रस्ता हा अतिशय निकृष्ट दर्जाचा झाला असून रस्त्यावर भरमसाठ खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. या रस्त्यावरून पादचाऱ्यांना चालणेही अवघड झाले आहे. रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे दुचाकी चालवणेही जीवघेणे ठरत आहे. या रस्त्याची अतिशय दुर्दशा झाल्याने एस.टी बस ही उलटली होती. सुदैवाने जीवित हाणी झालेली नाही. यापुढे या रस्त्याची परिस्थिती अशीच राहिल्यास भविष्यात फार मोठा जीव घेणे अपघात घडू शकतो आणि तसे घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही सर्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागर यांच्यावर राहील.

तरी या रस्त्याची त्वरित सुधारणा करण्यात यावी अन्यथ: येत्या 26 जानेवारी 2025 रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागर कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे लक्षणीय पोषण छेडण्यात येईल असा गंभीर इशाराही या निवेदनात मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी दिला आहे.या निवेदनाची प्रत कार्यकारी अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळूण यांना देण्यात आलेली आहे.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें