दळे सरपंच महेश करगुटकर यांनी वयक्तिक रागाने सेवेतून केले बडतर्फ

highlits

दळे सरपंच महेश करगुटकर यांनी वयक्तिक रागाने सेवेतून केले बडतर्फ

 

ग्रामपंचायत कर्मचारी संतोष कुवेसकर यांचा आरोप,न्यायासाठी गटविकास अधिकारी यांकडे केले अपील दाखल

 

समिर शिरवडकर -रत्नागिरी.

 

राजापूर:- दळे:- तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत दळे मधील आकृतिबंध तील ग्रामपंचायत कर्मचारी संतोष कुवेसकर यांना ग्रामपंचायत पत्र क्र.१३३ दि.१२ सप्टेंबर २०२५ रोजी सेवेतून बडतर्फ केल्याचे पत्र दिले.ग्रामपंचायत दळे मध्ये दि.०९ जून १९९० पासुन या कार्यलयात प्रामाणिक पणे सेवा देत असणारे ग्रामपंचायत कर्मचारी संतोष याना याचा धक्काच बसला.अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत जीवन जगत असतांनाच आणि गाठीला एक मुलगा आपलं शिक्षण पुर्ण करीत असताना, त्याचप्रमाणे पत्नी आणि स्वतःचा आजारपणतुन मार्गक्रमन करीत असताना हे आर्थिक बाजूचा आधार असणारे पत्र मिळताच धक्का बसला.कोणत्याही लेखी तक्रारी नसताना किव्हा दोषारोप नसताना अचानक वयक्तिक आकसापोटी मला सेवेतून बडतर्फ केले असल्याचे यावेळी त्यांनी बोलताना सांगितले.

ग्रामपंचायत कर्मचारी यांचे वेतन हे काही भाग ग्रामनिधी तर काही भाग जिल्हा परिषद मधून दिली जाते.मग जर ग्रामनिधी किव्हा जिल्हा परिषद यांचे वेतन म्हणून निधी असेल तर ग्रामसभा आणि गटविकास अधिकारी यांच्याशी किव्हा ग्रामसभेत ठरवून कर्मचारी यना पत्र बडतर्फ चे पत्र देता आले असते,परंतु,मनमानी कारभार चा ठपका असणारे सरपंच महोदय यांनी ग्रामविकास अधिकारी यांच्या सही शिवाय पत्र कर्मचारी यांना बाजवले. “माझ्या घरी येऊन माझी माफी ,तरच मी बडतर्फी चे पत्र मागे घेतो” असा सज्जड दम आणि सद्स्य व खुद्द ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे निरोप सुध्दा दिले.

◆ *ग्रामपंचायत कर्मचारी यांनी काय म्हटलं आहे अपिलात*

ग्रुप ग्रामपंचायत दळे मध्ये मी ३५ वर्ष इमान इतबारे सेवा बजावत आलो आहे.माझी कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे.मला सेवेतून कमी केल्यानें माझी परिस्थिती तसेच माझी प्रकृती चिंताजनक बनली आहे.मला कोणताही आर्थिक आधार नाही.माझी पत्नी सतत आजारी असते,मुलगा माध्यमिक शिक्षण घेत आहे.माझ्या सेवेची काही वर्षे शिल्लक राहिली आहेत.

माझी आथिर्क स्थिती चांगली नसताना विध्यमान सरपंच वयक्तिक आकस ठेऊन वागत असून माझी सतत अहवेलना करून लोकांसमोर मला अपमानित करीत असतात.हे सर्व सहन करून मी इमान इतबारे सेवा बाजाबत आलो आहे. तरी या विषयी सर्व चौकशी करून मला न्याय मिळवुन द्यावा अश्या आशयाचे पत्र (अपील) ग्रामपंचायत कर्मचारी संतोष कुवेसकर यांनी गटविकास अधिकारी राजापूर यांच्याकडे दिले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें