ए.जी. हायस्कूलचे संजय महाडीक सेवानिवृत्त: १५ वर्षांच्या प्रामाणिक सेवेचा गौरव

 

ए.जी. हायस्कूलचे संजय महाडीक सेवानिवृत्त: १५ वर्षांच्या प्रामाणिक सेवेचा गौरव

 


 

सेवापूर्ती सोहळा

 

दापोली : दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित ए.जी. हायस्कूलचे दिव्यांग सहाय्यक शिक्षक संजय शांताराम महाडीक हे नियतवयोमानानुसार दिनांक ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. मुख्याध्यापक एस. एम. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांना सेवानिवृत्तीबद्दल सदिच्छा देण्यात आल्या.

 

गौरव आणि शुभेच्छा

 

या कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत पद्य सादर करून केली. यावेळी संजय महाडीक यांच्याविषयी त्यांचे सहकारी वैभव नाटेकर, प्रा. शेषराव तिरपुडे, आणि चिपळूण युनायटेड स्कूलचे सहाय्यक शिक्षक अमित आदावडे यांनी त्यांचे अनुभव व संघर्षमय जीवनप्रवास कथन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांचे चिरंजीव श्रेयस महाडीक यांनीही बाबांच्या सहकार्यामुळेच उत्तम शिक्षण मिळत असल्याचे सांगून शुभेच्छा दिल्या.

महाडीक यांचे मदतनीस दिलीप महाडकर यांनीही त्यांचे अनुभव सांगून खडतर जीवनाचा प्रवास विषद केला. दापोली एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका व ए.जी. हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका स्मिता सुर्वे यांनी महाडीक दिव्यांग असूनही त्यांनी १५ वर्षांच्या सेवाकाळात विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे अध्यापन करून उत्तम सेवा केल्याचे सांगितले.

ए.जी. हायस्कूलचे शालेय समिती चेअरमन रविंद्र कालेकर यांनी महाडीक यांच्या अध्यापन कार्याचे कौतुक करून त्यांना असलेल्या अवांतर वाचनाची विशेष आवड हा उत्तम गुण इतरांनीही घ्यावा, असे आवाहन केले.

यावेळी संस्थेच्या व शाळेच्या वतीने त्यांना शाल, श्रीफळ, पुष्प, भेटवस्तू व मानपत्र देऊन गौरविण्यात आले. मानपत्राचे वाचन ओजस तेरेदेसाई यांनी केले.

 

संजय महाडीक यांचे मनोगत

 

सत्काराला उत्तर देताना संजय महाडीक यांनी दापोली एज्युकेशन सोसायटीचे विशेष आभार मानले. “दापोली एज्युकेशन सोसायटीमुळेच मला ए. जी. हायस्कूलसारख्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नामांकित शाळेत अध्यापन कार्य करण्याची संधी मिळाली. याबद्दल मी संस्थेचा आजन्म ऋणी राहील,” असे सांगून त्यांनी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार मानले.

 

उपस्थित मान्यवर

 

यावेळी उपमुख्याध्यापक अर्जुन घुले, पर्यवेक्षक अनिल पेटकर, मगदूमी एस.आय., ज्येष्ठ शिक्षिका मानसी अभ्यंकर, सातारा येथील राजेंद्र खाडे, तसेच संजय महाडीक यांचे मित्रपरिवार, नातेवाईक, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जीवन कदम यांनी केले, सूत्रसंचालन दीपक कोकणे यांनी केले तर आभार आर्या दाबके यांनी मानले.


#Hastags

#संजयमहाडीक #सेवानिवृत्ती #एजीहायस्कूल #दापोलीएज्युकेशनसोसायटी #शिक्षक #सेवागौरव #दापोली #रत्नागिरीबातम्या #शिक्षण

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें