डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, चिपळूणमध्ये प्रवेशासाठी अर्ज सुरू

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, चिपळूणमध्ये प्रवेशासाठी अर्ज सुरू

hmas.mahait.org वर ऑनलाईन किंवा गृहपालांकडे ऑफलाईन अर्ज करता येणार

रत्नागिरी : शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, चिपळूण येथे प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा किंवा आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन अर्ज गृहपालांकडे सादर करावा, असे आवाहन प्रभारी गृहपाल रविंद्र कुमठेकर यांनी केले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ही योजना राबविली जाते. मौजे कापसाळ, ता. चिपळूण येथील भाडेतत्वावरील इमारतीमध्ये हे वसतिगृह सुरू करण्यात आले आहे.

इयत्ता 8वी पासून उच्च शिक्षण, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम घेणारे आणि स्थानिक नसलेले मागासवर्गीय विद्यार्थी येथे प्रवेशासाठी पात्र ठरतील. प्रवेशित विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार निवास, भोजन, गणवेश आणि शैक्षणिक सुविधा मोफत उपलब्ध होणार आहेत.

वसतिगृहाची मान्य क्षमता 75 असून सामाजिक आरक्षणाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे : अनुसूचित जाती – 85%, अनुसूचित जमाती – 3%, विमुक्त जाती व भटक्या जमाती – 5%, आर्थिकदृष्ट्या मागास व इतर प्रवर्ग – 5%, विशेष मागास प्रवर्ग – 2%. याशिवाय दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 5% आणि अनाथ विद्यार्थ्यांसाठी 1% समांतर आरक्षणही लागू राहील.

📌 अर्ज ऑनलाईन – hmas.mahait.org
📌 अर्ज ऑफलाईन – गृहपाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, चिपळूण

 

 


🏷️ हॅशटॅग्स :

#चिपळूण #शासकीयवसतिगृह #मागासवर्गीयविद्यार्थी #रत्नागिरीवार्ताहर #शैक्षणिकवार्ता #AmbedkarHostel


📸 फोटो

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें