गुहागर तालुक्यातील चिमुरडी उत्तरा बारस्करला इंटरनॅशनल कराटे स्पर्धेत दुहेरी ब्रॉन्झ!

🥋 गुहागर तालुक्यातील चिमुरडी उत्तरा बारस्करला इंटरनॅशनल कराटे स्पर्धेत दुहेरी ब्रॉन्झ!

 

विरारमध्ये झालेल्या स्पर्धेत काटा व कराटे प्रकारात यश; गावकर्दे खालचीवाडीचा अभिमान उंचावला

 

रत्नागिरी : गुहागर तालुक्यातील गाव कर्दे (खालचीवाडी) येथील कन्या उत्तरा श्रीकांत बारस्कर (वय ५ वर्षे) हिने इंटरनॅशनल शोटोकन कराटे स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आपल्या गावाचे नाव उंचावले आहे.

 

विरार येथील विवा कॉलेजमध्ये २ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित या स्पर्धेत उत्तराने काटा व कराटे या दोन्ही प्रकारात प्रत्येकी एक ब्रॉन्झ मेडल (तिसरा क्रमांक) पटकावला. ती सेंट पिटर शाळा, विरार (पूर्व) येथे शिक्षण घेत आहे.

 

लहान वयातच उत्तरा हिने कराटेच्या मैदानावर दाखवलेली जिद्द आणि कामगिरी पाहून गावकऱ्यांत आनंद व्यक्त होत आहे. या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत असून गावकर्दे खालचीवाडीचे नाव तिने उज्ज्वल केले आहे.

 

 

 

 

🔖 हॅशटॅग :

 

#KarateChampion #UttaraBarskar #Guhagar #KonkanPride #ShotokanKarate #Ratnagiri

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें