जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत

 

🗳️ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत

 

राज्य निवडणूक आयोगाची घोषणा; 3 नोव्हेंबरला अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध होणार

 

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 32 जिल्हा परिषदा व 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी 13 ऑक्टोबर 2025 रोजी सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

 

या अनुषंगाने 10 ऑक्टोबर रोजी संबंधित जिल्हाधिकारी वृत्तपत्रांत आरक्षण सोडतीची सूचना प्रसिद्ध करतील. त्यानंतर 13 ऑक्टोबर रोजी सोडत काढल्यानंतर प्रारूप आरक्षणाची अधिसूचना जाहीर होईल.

 

14 ते 17 ऑक्टोबर 2025 या कालावधीत नागरिकांना हरकती व सूचना दाखल करता येतील. प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून 3 नोव्हेंबर 2025 रोजी शासन राजपत्रात अंतिम आरक्षण प्रसिद्ध केले जाणार आहे.

 

 

 

📌 हॅशटॅग्स :

 

#ZP #PanchayatSamiti #Election2025 #MaharashtraPolitics #ReservationDraw #StateElectionCommission

 

पा

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें