पडवेतील मुस्लिम बांधवांनी आमदार भास्कर जाधव यांची घेतली सदिच्छा भेट

🟢 पडवेतील मुस्लिम बांधवांनी आमदार भास्कर जाधव यांची घेतली सदिच्छा भेट

🕌 विकासकामांवर चर्चा; “आम्ही कायम तुमच्याच पाठीशी” – मुस्लिम बांधवांचा विश्वास

गुहागर (सुजित सुर्वे) ~ तालुक्यातील पडवे गावातील मुस्लिम बांधवांनी आज आमदार भास्कर जाधव यांची सदिच्छा भेट घेतली. गावातील विविध विकासकामे, नागरिकांच्या अडचणी आणि सामाजिक सलोखा या विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली.

स्वतःच राजकीय अस्तित्वासाठी राजकारण…

या भेटीत पडवे गावातील बहुसंख्य मुस्लिम कार्यकर्त्यांनी सांगितले की, “गावात काही ठराविक लोक स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करत आहेत; मात्र आम्हाला ते मान्य नाही. आम्ही कायम आमदार भास्कर जाधव यांच्या सोबत आणि त्यांच्या विकासाभिमुख भूमिकेच्या पाठीशी राहू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्वतःच्या फायद्यासाठी दिशाभूल करून शिंदे सेनेत प्रवेश….

गावात काही व्यक्ती ग्रामपंचायतीतील कामांमधून वैयक्तिक फायदा मिळवण्यासाठी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली. या नेत्यांनी मागील महिन्यात शिंदे गटात प्रवेश केला होता, असे सांगण्यात आले.

 

आमदार भास्कर जाधव यांनी या सर्व मुस्लिम बांधवांचे मनःपूर्वक स्वागत करत, “पडवे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. धर्म, समाज किंवा राजकारणापेक्षा विकासच माझा धर्म आहे,” असे आश्वासन दिले.

यावेळी पडवे येथील समीर गडदे, जहूर अब्बास कारभारी, शादाब खळे, मुस्तफा तवसाळकर, मुनावर गुहागरकर, हनीफ हर्णेकर, अन्सार इब्जी, सोहिब मुजावर, बासीत मुजावर, कमाल तवसाळकर, वसीम , फजल टेमकर, सइद  टेमकर, कबीर मुजावर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी आमदार भास्कर शेठ जाधव यांनी आपण लवकरच पडवे येथे येऊन सर्वांची संवाद साधणार आहोत असेही सांगितले.

 

 

 


🏷️ हॅशटॅग्स :

 

#भास्करजाधव #गुहागर #पडवे #मुस्लिमबांधव #रत्नागिरीवार्ताहर #कोकणविकास #ग्रामपंचायत #RatnagiriNews

 

 

 

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें