सोनइ आरोग्य केंद्रात मनमानी कारभार? वैद्यकीय अधिकारी ‘शेंगा फोडण्यात’ व्यस्त!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

📰 सोनइ आरोग्य केंद्रात मनमानी कारभार? वैद्यकीय अधिकारी ‘शेंगा फोडण्यात’ व्यस्त!

 

💉 लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय; रुग्णांकडे दुर्लक्ष, गैरवर्तनाचा आरोप

सोनई (तालुका अहमदनगर) येथे असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. क्षितिजा इंगळे यांच्यावर मनमानी कारभार व रुग्णांशी गैरवर्तनाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

 

सोमवार, दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी सुमारे १० वाजता लसीकरणासाठी मोठी गर्दी झालेली असताना लसीकरण परिचारिका काही कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यासाठी गेले असता त्या आपल्या कक्षात नसून दुसऱ्या खोलीत मोबाईलवर बोलत बसून ‘भुईमुगाच्या शेंगा फोडत’ असल्याचे स्थानिकांनी पाहिल्याचा आरोप आहे.

 

रुग्णसेवेच्या वेळेत अशा निष्काळजी वृत्तीबाबत विचारणा केल्यावर संबंधित डॉक्टरांचा बोलण्याचा सूर उद्धट व आव्हर्च असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. एवढेच नव्हे तर, “तुमच्यावर गुन्हा दाखल करू” अशा धमक्या देत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

 

या आरोग्य केंद्राविरुद्ध यापूर्वीही तक्रारी झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. लसीकरणासारख्या महत्वाच्या कामात गांभीर्याचा अभाव असून, आरोग्य विभागाने तत्काळ चौकशी करून योग्य कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

 

📍 जिल्हा प्रतिनिधी: नंदकुमार बगाडे पाटील

📍 सहयोगी प्रतिनिधी: रोहित गवळी (सोनई वार्ताहर)

 

 

 

🔖 हॅशटॅग्स:

 

#सोनई #प्राथमिकआरोग्यकेंद्र #डॉक्षितिजाइंगळे #आरोग्यविभाग #लसीकरण #मनमानीकारभार #रुग्णसेवा #नंदकुमारबगाडे #सोनईवार्ताहर #RatnagiriVartahar

 

 

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]