सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे श्री. सुबोधकुमार (आय.ए.एस.) यांची भेट

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे श्री. सुबोधकुमार (आय.ए.एस.) यांची भेट

 

कोकणातील शाश्वत विकास आणि मत्स्य व्यवसायाच्या अभ्यासासाठी दौरा

 

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत असलेल्या ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी’ येथे दिनांक 08 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनाचे विशेष नियोजन अधिकारी श्री. सुबोधकुमार (आय.ए.एस.) यांनी भेट दिली.

सिडकोकडून कोकण किनारपट्टी विकास प्रकल्पाकरिता श्री. सुबोधकुमार यांची ‘विशेष नियोजन अधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी यापूर्वी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, प्रधान सचिव (वित्त), विक्रिकर आयुक्त तसेच केंद्रीय खादी सचिव अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

 

कोकण विभागातील पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये शाश्वत विकास, स्थानिकांचे आर्थिक सक्षमीकरण आणि समन्वित नियोजन हे उद्दिष्ट ठेवून राज्य शासनाने त्यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय सल्लागार मंडळ स्थापन केले आहे. याच उद्देशाने कोकणातील फळबागायत व मत्स्य व्यवसायाचा अभ्यास करण्यासाठी सदर दौरा आयोजित करण्यात आला होता.

 

भेटीदरम्यान त्यांच्यासोबत डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय सावंत हेही उपस्थित होते.

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. केतन चौधरी (वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी व विभाग प्रमुख) यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यानंतर सुबोधकुमार यांनी ‘मत्स्यालय व मत्स्य-संग्रहालय’ यांची पाहणी केली. विविध सागरी प्रजातींचे संग्रहन पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले तसेच हे केंद्र विद्यार्थी व पर्यटकांसाठी एक आदर्श पर्यटन स्थळ असल्याचे नमूद केले.

 

भेटीदरम्यान केंद्रातील डॉ. आसिफ पागरकर (प्राध्यापक), डॉ. हरीश धमगाये (अभिरक्षक), प्रा. नरेंद्र चोगले, प्रा. सचिन साटम (सहाय्यक संशोधन अधिकारी), श्रीमती वर्षा सदावर्ते, श्रीमती अपुर्वा सावंत (जीवशास्त्रज्ञ), श्री. रमेश सावर्डेकर (वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक) आणि श्री. तांबे (कार्यालय अधीक्षक) उपस्थित होते.

 

 

 

सुबोधकुमार आयएएस रत्नागिरी, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव रत्नागिरी,

 

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]